HW Marathi
देश / विदेश राजकारण

‘लॉकडाऊन’संदर्भातील ‘ते’ ट्वीट अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केले डिलीट

नवी दिल्ली | राज्यात कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे   देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी सध्या स्थितीचा आढावा घेत त्यांच्याशी चर्चा केली.  मात्र, या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर अरुणाचल प्रदेशांच्या मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी लॉकडाऊन संदर्भात एक ट्विट केले. मुख्य म्हणजे या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींनाही टॅग केले. पण थोड्याच वेळात त्यांनी हे ट्विट डिलीटही केले.

पंतप्रधानांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अरुणाचलचे मुख्यमंत्र्यांचे  ट्वीट लिहिले की, ‘लॉकडाउन १५ एप्रिलला पूर्ण होईल पण याचा अर्थ असा नाही, की लोक रस्त्यावर फिरून मोकळे होतील. त्यांना त्यांची जबाबदारी आणि सामाजिक काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाशी लढण्याचा हा एकमेव मार्ग आहे.’ या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींनाही टॅग केलं. पण थोड्याच वेळात त्यांनी हे ट्विट डिलीटही केले. खंडू पुन्हा  एक ट्वीट करत म्हणाले की, ‘लॉकडाऊन कालावधी लक्षात घेता केलेले ट्विट एका अधिकाऱ्याने केले. ज्याला हिंदी भाषेचे तितकीशी कमी आहे, त्यामुळे ते ट्विट हटविण्यात आले आहे,’ असे स्पष्टी करण त्यांनी दिले.

देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढताना दिसत आहे. भारतात मृतांचा आकडा ५२ वर पोहोचला आहे. आज मोदींच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये  महाराष्ट्र, मिझोरम, दिल्ली, बिहार, तेलंगणा, पुडुचेरी, गोवा, त्रिपुरा, उत्तराखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश या मुख्यमंत्र्यांसह राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशांचे प्रशासक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींशी चर्चेसाठी उपस्थित होते.

 

 

 

 

Related posts

सरकारकडून शेतकऱ्यांना खुशखबर, २० एप्रिलपासून कापूस विक्री होणार सुरु

News Desk

सध्या विरोधक हे गलितगात्र झाल्याचे चित्र आहे !

News Desk

‘फनी’ चक्रीवादळ ओडिसा किनारपट्टीवर धडकले, वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात

News Desk