HW Marathi
Covid-19 देश / विदेश

दिल्लीत लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही !

नवी दिल्ली | देशातील राजधान दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या  वेगाने वाढत आहे. यामुळे दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर रंग होत्या. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याची कोणतीही योजना नसल्याचे त्यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे.

दिल्लीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (१५ जून) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व पक्षीय बैठक बोलविली होती. या बैठकीमध्ये भाजप, आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि दिल्लीचे बसपाचे अध्यक्ष आदी नेत्यांचा समावेश आहे. तसेच अमित शहा यांनी काल (१४ जून) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठकी बोलविली होती. यानंतर अमित शहा यांनी काल सायंकाळी पाच वाजता महापौर आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत बोलविली होती. आणि या बैठकीला लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हेदेखील उपस्थित होते.

दिल्लीत गेल्या २४ तासांत दिल्लीमध्ये २२२४ नवीन रुग्ण आढळले आहेत आणि ५६ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दिल्ली कोरोनाची रुग्णांची संख्या ४११८२ वर पोहचली आहेत, तर आतापर्यंत १३२७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच  देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ११ हजार ५०२ नवे रुग्ण आढळले. तर ३२५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. चिंताजनक म्हणजे भारतात कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ३२ हजार ४२४ वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत तब्बल ९ हजार ५२० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Related posts

आज मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंग चौहान चौथ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ ?

अपर्णा गोतपागर

मी बाराशे कायदे कालबाह्र केले, आणखी करणार- मोदी

News Desk

३१ जुलैनंतर लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

News Desk