HW Marathi
देश / विदेश राजकारण

दिल्लीत आशिष शेलारांनी घेतली शरद पवारांची भेट!

नवी दिल्ली | भाजप आमदार आशिष शेलार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. दिल्लीतील ६ जनपथ येथे शेलार हे पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात ही भेट नेमकी कशासाठी  हे अद्याप समोर आलेलं नाही. पण या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकीय वर्तुळात यामुळे पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे.  राज्यात भाजप आणि महाविकासआघाडीत यांच्यात अनेक मुद्द्यांवरून वाद आणि आरोप-प्रत्योरोप सुरु आहे.

भाजपकडून सतत महाविकासआघाडीला लक्ष्य केलं जात आहे. त्यात शेलार हे पवारांच्या भेटीला पोहोचल्याने पुन्हा राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. याआधीही शेलारांनी अशीच पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून त्यांच्या सोबतचा फोटो देखील शेअर केला होता. राज्यातील राजकारणात विविध घडामोडी सुरु आहेत. याआधी भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याचा दावा काही नेत्यांनी केला होता.

Related posts

माझी मुलगी पूर्णपणे निर्दोष, रॅगिंगचा विचारही करू शकत नाही !

News Desk

बजरंग दलाचे माजी नेते बाबू बजरंगी यांची जन्मठेप कायम

News Desk

कंपाऊंडरला सतत चर्चेत राहायची भूक, संजय निरुपमांचा  राऊतांना अप्रत्यक्ष टोला

News Desk