जयपूर | राजस्थानमध्ये राजकीय वर्तुळात प्रचंड गोंधळ सुरू आहे. आरोप, प्रत्यारोप, टीका टिप्पणी सुरूच आहे. काल (१४ जुलै) सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्यानंतर अनेक स्तरांवरून चर्चा सुरू झाल्या. अशातच, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर त्यांनी भाजप नेत्यांसोबत मिळून सरकार पडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला. आता पुन्हा एकदा अशोक गेहलोत यांनी पायलट यांच्यावर निशाणा साधला आहे.
“उत्तम इंग्लिश बोलणे, हॅण्डसम दिसणे हेच सर्वकाही नसतं. देशाबद्दल आपल्या मनात काय आहे, आपली विचारधारा, धोरणे आणि वचनबद्धता, हे सर्व काही विचारात घेतली जाते” अशी घणाघाती टीका पायलट यांच्यावर गेहलोत यांनी केली आहे.
Speaking good English, giving good bytes and being handsome isn't everything. What is inside your heart for the country, your ideology, policies, and commitment, everything is considered: Ashok Gehlot, Rajasthan Chief Minister pic.twitter.com/xHS5WzajWb
— ANI (@ANI) July 15, 2020
इतक्यावरच न थांबता ते असेही म्हणाले की, “मी ४० वर्षांपासून राजकारणात आहे, आम्हालाही नवीन पिढी आवडते, भविष्य त्यांचेच आहे. हे नवीन पिढीचे नेते, ते केंद्रीय मंत्री झाले, प्रदेशाध्यक्ष झाले आहेत, आमच्या काळात आम्ही काय-काय केले हे ठाऊक असते, तर त्यांना नीट समजले असते.” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
I have been in politics for 40 years, we love the new generation, the future will be theirs. This new generation, they have become central ministers, state presidents if they had gone through what we did in our time, they would have understood: Ashok Gehlot, Rajasthan CM pic.twitter.com/2QpXs8rexM
— ANI (@ANI) July 15, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.