HW Marathi
देश / विदेश

आशियातील पहिली ‘यंगेस्ट आर्यन मॅन’ रविजा सिंगल

नवी दिल्ली | ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या खडतर अशा आर्यनमॅन स्पर्धेत रविजा सिंगल हिने उत्कृष्ट कामगिरी करत आशियातील ‘यंगेस्ट आर्यनमॅन’ बनली आहे. रविजा हिने ही स्पर्धा १६ तास ५ मिनिटे आणि ५० सेकंदात पूर्ण केली आहे.

रविजा ही राष्ट्रीय स्तरावरची स्विमर असून तिने याच वर्षी फेब्रुवारीत दिल्लीमध्ये पार पडलेली हाफ आर्यनगर्ल स्पर्धा जिंकली होती. वयाच्या १९ व्या वर्षीच रविजाने हा किताब आपल्या नावावर केला आहे. ३.८६ किमी स्विमिंग, १८०.२५ किमी सायकलिंग आणि ४२.२० किमी रनिंग असे या स्पर्धेचे स्वरूप होते.

यावर्षी ऑगस्ट महिन्यात फ्रान्समध्ये झालेल्या आर्यनमॅन स्पर्धेत ती अवघ्या ५ मिनिटांनी मागे राहिली होती. तिने ऑस्ट्रेलियातील स्पर्धेसाठी सराव केला. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने तिने भारताचा झेंडा आशिया खंडात फडकवल्यामुळे मला तिचा अभिमान आहे, असे डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी सांगितले. रवीजा २ वर्षांपासून डॉ. पिंपरीकर यांच्या जिममध्ये सराव करत असून तिला मुस्तफा टोपीवाला यांचे मार्गदर्शन लाभले.

वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशनकडून ही स्पर्धा घेण्यात येते. यात एकाच दिवशी पोहणे, सायकल चालवणे आणि धावावे लागते. यामध्ये ३.८६ किलोमीटर पोहणे, १८०.२५ किलोमीटर सायकलिंग करणे आणि ४२.२० किलोमीटर धावणे याचा समावेश असतो. १७ तासात ही स्पर्धा पूर्ण करावी लागते.

Related posts

देशात एका दिवसात तब्बल ६,०८८ सर्वाधिक संख्या कोरोना रुग्णांची नोंद

News Desk

मला दिल्लीत इंटरेस्ट नव्हता ,राज्यसभेवरून संजय काकडेंचा यु-टर्न!

Arati More

शबरीमला प्रकरणाची सुनावणी लांबणीवर

News Desk