HW News Marathi
देश / विदेश

ऑडी डिव्हिजनचे सीईओ रुपर्ट स्टँडलर यांना अटक

नवी दिल्ली | फॉक्सव्हॅगन ग्रुपच्या ऑडी डिव्हिजनचे सीईओ रुपर्ट स्टँडलर यांना अटक करण्यात आली आहे. “स्टॅडलर यांना आज सकाळी अटक करण्यात आली असून, त्यांना ताब्यात ठेवायचे की नाही, यावर सुनावणी सुरु आहे.”, अशी माहिती ऑडीच्या प्रवक्त्यांनी दिली.

रुपर्ट स्टॅंडलर आणि सहआरोपींनी फसवणुकीसाठी बनावट कागदपत्र तयार केली, ज्यामुळे इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड असूनही गाड्या विक्री करण्यास परवानगी मिळाली. फॉक्सव्हॅगन, पोर्श आणि ऑडी यांसारख्या गाड्यांमध्ये इमिशन टेस्टिंग करणारे सॉफ्टवेअर आहे, मात्र या सॉफ्टवेअरमधून योग्य माहिती मिळत नाही. सप्टेंबर 2015 चे हे प्रकरण असून, या प्रकरणात 20 हून अधिक जण चौकशीच्या घेऱ्यात आहेत.

बीबीसीच्या वृत्तानुसार, ऑडी A6 आणि A7 मॉडेलच्या 60 हजार गाड्यांमध्ये प्रदूषण स्तर लपवण्यासाठी या सॉफ्टवेअरचा वापर केला गेल्याचं रुपर्ट स्टॅडलर यांनी मान्य केले. अमेरिका आणि इतर काही देशांनी 2009 साली गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावरुन नियम अधिक कठोर केले होते. या नियमांना डावलल्यास कंपनीला दंड आकारला जातो. या दंडापासून वाचण्यासाठी ऑडी कंपनीने गाडीमध्ये अशा सॉफ्टवेअरचा वापर केला, ज्यामुळे प्रदूषणाच्या टेस्टिंगदरम्यान चुकीचे आकडे समोर येतात.

 

Related posts

PMLA कायद्यातील ईडीचे अधिकार अबाधित; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Aprna

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लक्ष्मण रेषा पाळा, पंतप्रधानांचे भारतीयांना आवाहन

swarit

विरोधी पक्षाच्या मागणीमुळे ईव्हीएममध्ये मोठा बदल

News Desk