HW Marathi
देश / विदेश

ऑगस्ता वेस्टलँड घोटाळा : ख्रिस्तियन मिशेल भारताच्या ताब्यात

मुंबई | ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि ब्रिटीश नागरिक ख्रिस्तियन मिशेलला दुबईतून भारतात आणण्यात आले आहे. ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारातील मध्यस्थ व कंत्राटासाठी कंपनीकडून सुमारे २२५ कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आरोप ख्रिस्तियनवर लावण्यात आला आहे. याप्रकरणातील आणखी दोन मध्यस्थ अद्याप फरार आहेत. भारतात लँड होताच सीबीआय अधिकाऱ्यांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले आहे.

दुबई कोर्टाच्या प्रत्यार्पणानंतर काल (४ डिसेंबर) संध्याकाळी यूएइने ख्रिस्तियन मिशेलला भारताच्या ताब्यात दिले. सीबीआयने रात्रीच मिशेल दिल्लीला आणले. त्यानंतर त्याला थेट सीबीआय कार्यालयात नेण्यात आले. या घोटाळ्यासंबंधी सीबीआय मिशेलची चौकशी करणार आहे. आज(५ डिसेंबर) त्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करणार आहे.राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजिल डोवाल यांच्यावर ख्रिस्तियन मिशेलच्या प्रत्यार्पणाची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या नेतृत्वात प्रत्यार्पणाची संपूर्ण कामगिरी पार पडण्यात आली असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे.

 

Related posts

तेलंगणा विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त करण्याची राज्यपालांकडे शिफारस

News Desk

सगल तीन दिवस बँका रहाणार बंद

News Desk

खबरदार … शेतक-यांचा संयम सुटतोय

News Desk