HW Marathi
देश / विदेश राजकारण

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला १ रुपयांचे पहिले दान

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ फेब्रुवारीला अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट नावाचे विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा लोकसभेत केली. या ट्रस्टमध्ये एकूण १५ सदस्य असतील ज्यातील ९ कायमस्वरुपी आणि ६ नामनिर्देशित सदस्य असणार आहेत. या विश्वस्त मंडळाची स्थापना झाल्यानंतर केंद्र सरकारने या विश्वस्त मंडळाला १ रुपयाचे रोख दान दिले. या विश्वस्त मंडळाला मिळालेले हे पहिले दान आहे.

या ट्रस्टचे कामकाज सुरवातीला ज्येष्ठ विधिज्ञ के. परासारन यांच्या निवासस्थानातून पाहिले जाणार असून कालांतराने कामाच्या देखरेखीसाठी अधिकृत स्वतंत्र कार्यालयही स्थापन करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. दरम्यान काही ज्येष्ठ संतांचा समावेश या ट्रस्टींमध्ये नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. भव्य आणि उदात्त असे राममंदिर उभारण्यासाठी दिलेली तीन महिन्याची मुदत संपण्याआधीच्या चार दिवसांआधीच ही घोषणा पंतप्रधानांनी लोकसभेत केली.

Related posts

नाव छत्रपतींचे, काम अफजलखानाचे

News Desk

तलवारीने कापला नववीतील मुलीचा हात

News Desk

केजरीवालजी ‘आप’ भी वो’ निकले ?

News Desk