HW News Marathi
देश / विदेश

अयोध्येत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही अतिथी राहणार अनुपस्थितीत

नवी दिल्ली | अयोध्येत उद्या (५ ऑगस्ट) राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. यासाठी अयोध्येतील भूमिपूजनाची तयारीदेखील पूर्ण झाली आहे. अयोध्येतील राम मंदिराचा आणि आसपासचा परिसरही दिमाखदार पद्धतीने सजवण्यात आला आहे. तसेच, सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेण्याच्या सुचना देखील देण्यात आल्या आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल (३ ऑगस्ट) अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला होता.
उद्या दुपारी १२ वाजता पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याआधीच ज्या पाहूण्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे ते पाहुणे आज (४ ऑगस्ट) अयोध्येत पोहोचणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आज संध्याकाळपासून अयोध्या सील करण्यात येणार आहे. श्रीराम मंदिराच्या ट्रस्टकडून एकूण १७५ जणांना भूमिपूजनाचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्यापैकी देशातील निरनिराळ्या भागातील संतांचा समावेश आहे. प्रत्येक निमंत्रण पत्रिकेवर एक कोड छापण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणामूळे हा कोड तयार करण्यात आला आहे.

मंदिर ट्रस्टकडून सर्वप्रथन इक्बाल अन्सारी यांना निमंत्रण देण्यात आले. ते सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशिदीकडून पक्षकार होते. याव्यतिरिक्त सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्येत विशेष अतिथी म्हणून दाखल होणार आहेत. तर दुसरीकडे अशोक सिंघल यांच्या कुटुंबीयांनादेखील या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.

कोरोनाच्या संकटामूळे काही अतिथी अनुपस्थितीत राहणार आहेत.भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह काही नेते या कार्यक्रमाला येणार नाही. या कार्यक्रमासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचीही व्यवस्था केली जात आहे. या व्यतिरिक्त कल्याण सिंह, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हेदेखील उपस्थित राहणार नाही असे सांगण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनधन खातेधारकांत महिलांची संख्या ५५ टक्के, केंद्रीय अर्थमंत्रालयाची माहिती

News Desk

सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात घट

swarit

बाप्पाच्या सजावटीसाठी मुंबईतील मखर अबु धाबीला

swarit