HW News Marathi
महाराष्ट्र

‘संजय राव खुर्सी संभालो हवा तेज चलता है’, मनसेकडून सूचक ट्विट

मुंबई | “संजय राव खुर्सी संभालो हवा तेज चलता है”, असे ट्वीट मनसेचे सरचीटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटमूळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. हे ट्वीट नेमकी कोणासाठी केले हे देशपांडे यांनी स्पष्ट जरी केले नसले तरी ट्वीटखाली युजर्स याचा संदर्भा सध्या घडत असलेल्या राजकीय घटनांशी जोडत आहेत. या ट्वीटच्या माध्यमातून संदीप देशपांडे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत शिवसेना-भाजपच्या वादात उडी घेतल्याची देखील चर्चा आहे.

राजकीय घडामोडींबद्दल भाष्य करताना किंवा आपले मत मांडताना अनेक नेते सिनेमातील गाणी किंवा डायलॉग्जचा आधार घेतात. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कारवाईची दिशा स्पष्ट होत नसताना राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुशांतच्या घरी झालेल्या कथित पार्टीत महत्वाचा नेता सहभागी असल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली होती. पण अशाप्रकारच्या पार्टीचे कोणतेच पुरावे दिसले नाहीत असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभुमीवर शिवसेने खासदार संजय राऊत यांनी काल (३ ऑगस्ट) सूचक ट्वीट केले होते.

 

राज कुमार यांच्या डायलॉगची त्यांनी आठवण करुन देत, “चिनाय सेठ…, जिनके घर शीशेके बने होते है..वो दुसरो पे पत्थर नही फेका करते..”समझने वालोंको इशारा काफी है! असे ट्वीट राऊतांनी केले होते. संजय राऊतांनी या ट्वीटच्या माध्यमातून सरकारवर शंका उपस्थित करणाऱ्या भाजपवर निशाणा साधला होता. पण आता मनसेने याप्रकरणावरुन पुन्हा एकदा शिवसेनेला आवाहन केल्याने लक्षात येत आहे. आता याला प्रत्यूत्तर काय मिळणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोरखपूर मंदिर परिसरातील हल्ला प्रकरणी तपास सुरू, UP एटीएसची टीम मुंबईत दाखल

Aprna

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात नाही.

News Desk

मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी ‘कोकण’ बँकेतर्फे 11 लाखांची पे-ऑर्डर

News Desk