HW News Marathi
देश / विदेश

Ayodhya Verdict : सर्वोच्च न्यायालय उद्या देणार मध्यस्थीबाबतचा निर्णय

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी (८ मार्च) अयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणातील मध्यस्थीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी सकाळी १०.३० याबाबतचा निर्णय देणार आहे. बुधवारी (६ मार्च) या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थीची नेमणूक करायाची की नाही ? यावर महत्त्वपूर्ण निर्णय देणार होता. मात्र, त्यानंतर याबाबतची सुनावणी पुढे ढकलत निर्णय राखून ठेवला गेला. अखेर उद्या सर्वोच्च न्यायालयाकडून याबाबतचा निर्णय देण्यात येणार आहे.

अयोध्या जमीन वाद प्रकरणात मध्यस्थी नेमण्याला हिंदू समाज पार्टीच्या वकीलांनी विरोध केला असून निर्मोही आखाडा आणि मुस्लिम पक्षकार मात्र यासाठी तयार आहेत. बुधवारी (६ मार्च) सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठाने सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेऊन मध्यस्थाचे नाव सुचवण्यास सांगितले. तर दूसरीकडे राजीव धवन हे जाणूनबुजून अयोध्या प्रकरणी विलंब करत आहेत. मध्यस्थी करणे म्हणजे वेळकाढूपणाचे धोरण असून धवन प्रत्येक वेळी सुनावणी पुढे कशी जाईल यासाठी प्रयत्नशील असतात, असा आरोप हिंदू समाज पार्टीच्या वकीलांनी यावेळी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार चालवता येत नसेल तर उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा !

News Desk

यंदाच्या स्वातंत्र दिनी या राजकीय नेत्यांनी केले ध्वजारोहण

swarit

जाणून घ्या… भारतात कोणकोणत्या राज्यात किती ‘कोरोना’बाधित ?

swarit