June 26, 2019
HW Marathi
देश / विदेश

Ayodhya Verdict : आता सुनावणीची तारीख २९ जानेवारीला होणार निश्चित

नवी दिल्ली | गेली अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अयोध्या प्रकरणाला निकाली काढण्यासाठी सर्वोच्य न्यायालयाने आज (१० जानेवारी) २९ जानेवारीला सुनावणीची तारीख निश्चित होणार असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले. या सुनावणीसाठी नवीन पाच सदस्यीय घटनापीठाची नेमणूक करण्यात येणार आहे.

न्यायमूर्ती यू. यू. ललित हे पाच घटनापीठाच्या सदस्यीयमधून बाहेर पडले आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने घटनापीठाच्या सदस्यांची नेमणूक करण्यात येईल. यानंतर घटनापीठात कोणत्या न्यायमूर्तीची निवड होईल. याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. याआधी ६ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी नवीन घटनापीठ स्थापन केले होते. घटनापीठामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती एन. व्ही. रामाणा, न्यायमूर्ती यू. यू. ललित आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांचा समावेश आहे.

अयोध्या जागेच्या वादाप्रकरणी २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकांविरोधात नव्या पीठाकडून सुनावणी होईल, असे ४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. ‘हे राम जन्मभूमीचे प्रकरण आहे. या प्रकरणी नव्या पीठाचे गठन होणार असल्याने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. ही सुनावणी १० जानेवारी रोजी होणार आहे,’ असे सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी त्यावेळी म्हटले होते.

या वादग्रस्त जमीन रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड अशा तीन पक्षकारांमध्ये विभागण्यात यावी, असा निर्णय न्यायालयाने दिला होता. अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद विवादासंबंधी २.७७ एकर जमिनीच्या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या ३० सप्टेंबर २०१० रोजीच्या २-१ अशा बहुमताच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात १४ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

 

Related posts

तुम्हाला हव्या त्या वस्तू खरेदी करा, निघून जा !

News Desk

कर्नाटकात इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

News Desk

बजेटमुळे नाराजी, सेन्सेक्स घसरला

News Desk