HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या

नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये झालेल्या कपातीनंतर आता पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोलच्या किंमतीत ३६ पैसे तर डिझेलच्या किंमतीत ३० पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई आज पेट्रोलची प्रतिलिटर किंमत ७४.५२ रुपये तर डिझेलची प्रतिलिटर किंमत ६५.४२ एवढी झाली आहे.

राजधानी दिल्लीतही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत ३७ तर डिझेलच्या किंमतीत २८ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोलची प्रतिलिटर किंमत ६८.८८ तर डिझेलची किंमत ६२.५३ रुपये एवढी झाली आहे. दरम्यान, नववर्षाच्या मुहूर्तावर घटलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये पुन्हा झालेली ही वाढ जर सातत्याने होत राहिली तर जनसामान्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इस्रायल-पॅलेस्टाईन वाद भडकला, हमासच्या हल्ल्याला इस्रायलचं जशास-तसं उत्तर

News Desk

गोव्याच्या सत्तेतील भागीदार पक्ष NDA मधून बाहेर भाजपला धक्का

News Desk

माजी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk