HW News Marathi
देश / विदेश

Ayodhya Verdict Live Updates: ऐतिहासिक निर्णय, अयोध्येची जमीन रामलल्लाचीच !

नवी दिल्ली | संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणाचा आज (९ नोव्हेंबर) निकाल लागणार आहे. या प्रकरणाची सुनावणीला आज सकाळी १०.३० वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे ४० दिवस सुनावणी झाल्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालामुळे सर्व राज्यांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना आहेत. यानंकालानंतर सोशल मीडियावरून विविध अफवा वा प्रक्षोभक संदेश एकमेकांना पाठवले जाण्याची शक्यता लक्षात घेऊ न सोशल मीडियावर पोलीस लक्ष ठेवून आहेत.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ आज निकाल देणार आहेत. यात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांचा समावेश आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Ayodhya Verdict Live Updates:

 

  • २४ तासासाठी मुंबईत जमाव बंदीचे आदेश देण्यात आले आहे.
  • ट्रस्ट स्थापन करून राम मंदिर बांधण्याचे आदेश, सर्वोच्च न्यायालने दिला आहे.
  • मुस्लिमांना मशिद बांधण्यासाठी आयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देणार
  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सुन्नी वक्फ बोर्डाकडून स्वागत केले
  • वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच सर्वोच्च न्यायालयाने सांगितले
  • मुस्लिमांना अयोध्येत पर्यायी जागा मिळणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
  • उच्च न्यायालयाने केलेले तीन भाग चुकीचे असल्याचे सर्वोच्च न्ययालायने म्हटेल,त्यामुळे या जमीनीचे तीन भाग होणार नाही, असे न्यायालयाने सांगितले
  • १९५६ पूर्वी हिंदूंकडून वादग्रस्त जागेवर पूजा, १८५६-५७ ला नमाज पठणाचे पुरावे नाहीत
  • सीता की रसोई, चौथऱ्याचे अस्तित्व न्यायलायकडून मान्य करण्यात आले आहे.
  • रामाचा जन्म अयोध्येत झाला यात वादच नाही
  • मशिदीच्या बाधकांमात जुन्या दगडांचा वापर केल्याचे होती.
  • बाबारी मशिदी रिकाम्या जागावर बांधली नव्हती, मशिती खाली मोठी रचना होती.
  • अयोध्येतील अवशेष हे इस्लामिक कला कृतीचे आवशेष नव्हते.
  • रामल्ललाचा दावा न्यायालयाकडून मान्य करण्यात आला.
  • शिया वक्क बोर्डाचा दावा देखील न्यायालयाने फेटळून लावला
  • सुन्नी बोर्डाचा दाव्यावर निकालाचे वाचन, वादग्रस्त जागी मशिद घोषणा करा, अशी मागणी बोर्डाने केली आहे
  • निर्मोही आखाड्याचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला
  • सर न्यायाधीश रंजन गोगोई सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे.
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक बोलविण्यात आली
  • अयोध्या प्रकरणावर जो निकाल येईल तो सर्वांनी मान्य करावा, कोणताही वाद निर्माण करु नये, वातावरण बिघडू नये असे आवाहन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे.
  • १५ मिनिटात अयोध्या प्रकरणाचा निकाल वाचण्यास सुरुवात होणार आहे
  • दुपारी १ वाजता सरसंघचालक मोहन भागवत माध्यमांशी बोलणार अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत दुपारी १ वाजता माध्यमाशी संवाद साधणार आहे.
  • उत्तर प्रदेशात कलम १४४ लागू, पोलिसांची चोख व्यवस्था
  • राजस्थानच्या जयपूर भागात २४ तासासाठी इंटरनेट सेवा खंडीत
  • अयोध्येत ४ हजार सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहे
  • अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल कुणाची जीत अथवा हार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शांतता राखण्याचे आवाहन
  • सोशल मीडियावरही मुंबई पोलिसांची करडी नजर असणार आहे. ज्या ठिकाणाहून आक्षेपार्ह पोस्ट शेअर होतील, ते अकाऊंट ब्लॉक करुन त्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
  • मुंबईत ५ हजारपेक्षा जास्त सीसीटीव्ही आणि ड्रोन युनिटद्वारे आज लक्ष ठेवण्यात येणार आहे. मुंबईत अद्याप कलम १४४ लागू झालेला नसला, तरी उद्याच्या परिस्थितीवर यावर निर्णय घेण्यात येईल.
  • आयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ट्रायकडून ग्राहकांना चॅनेल्स निवडीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

News Desk

तीन दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

दिलीप वळसे पाटलांनी गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच अनिल देशमुखांनी केले ‘हे’ ट्विट

News Desk