नवी दिल्ली | भाजपच्या खासदार रमा देवी यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांनी लोकसभेत माफी मागितली. आझम खान यांनी लोकसभा दोन वेळा माफी मागितली आहे. “माझी अशी कोणती भावना त्यांच्या प्रति नव्हती आणि ना असू शकत नाही. माझे भाषण आणि स्वभावाला संसदेतील सर्वजण जाणता. तरी देखील तुम्हाला वाटेत असेल की, माझी चुकी आहे. तर मी त्यासाठी माफी मागतो,” असे म्हणत आझम खान यांनी लोकसभेत रमा देवी यांची माफी मागितली
BJP MP Rama Devi in Lok Sabha: Azam Khan ji’s remark has hurt both women and men in India. He will not understand this. Inki aadat bigadi hui hai, zaroorat se zada bigadi hui hai. I have not come here to hear such comments. pic.twitter.com/Z1tvupdNvW
— ANI (@ANI) July 29, 2019
“आझम खान यांच्या अशा वागण्याने देशातील महिला आणि पुरुषाची मने दुखावली गेली आहेत. त्यांनी हे समजणार नाही, ते सवयी बिघडल्या आहेत. ते खूप जास्त बिघलेल्या आहेत. संसदेत हे ऐकण्यासाठी आम्ही येथे येत नाही, “असे रमा देवी यांनी आझम खान यांच्या माफीनंतर यांना सडेतोड उत्तर दिले.
नेमके काय आहे प्रकरण
तिहेरी तलाकवर चर्चा सुरू असताना आझम खान यांनी रमा देवी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका केली होती. यावेळी खान म्हणाले की, “‘तू इधर-उधर की ना बात कर…’ असा शेर म्हणत बोलायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या रमा देवी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. ‘आप मुझे इतनी लगती है की मेरा मन करता है की, आप की आँखो में आँखे डाले रहूँ’ असे आझम खान यांनी म्हणताच लोकसभेत गदारोळ झाला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.