HW News Marathi
देश / विदेश

भारतीय जवानांवर आझम यांचे अप्रत्यक्ष गंभीर आरोप

लखनऊ – बोलघेवडे म्हणून प्रसिद्ध असलेले समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी भारतीय जवानांवर अप्रत्यक्षरित्या बलात्काराचे आरोप केले आहेत. बलात्काराच्या घटनांमुळं महिला दहशतवादी जवानांची गुप्तांगं कापत असल्याचं खळबळ उडवून देणारं वक्तव्यं आझम यांनी केलंय.

काश्मीरमध्ये महिलांनी जवानांना चोपलं. इतकंच नाही तर महिलांनी जवानांची गुप्तांगं कापली. बलात्काराच्या घटनांमुळे बदला घेण्यासाठी महिला दहशतवादी जवानांची गुप्तांगं कापत आहेत. अशा घटना या संपूर्ण भारतासाठी लाजिरवाणी बाब आहे. जगात तोंड दाखवायलाही जागा राहिली नाही, असं खान म्हणाले.

या दहशतवादी महिला-पुरूष जवानांचे हात-पाय तोडत नाहीत, त्यांना त्यांच्या शिराचीही अडचण नव्हती. त्यांनी जवानांच्या गुप्तांगाला लक्ष्य करून ते कापल्याचं खान म्हणाले आहेत. इतंकच नाही तर आसाम आणि झारखंडमध्येही महिलांनी जवानांना मारहाण केलीय. त्यामुळं मोदींच्या राज्यात देशाची वाटचाल भयावहतेच्या दिशेनं सुरूय. देश बॅलेट ऐवजी बुलेटचा मार्ग अवलंबत आहे. त्याचा परिणाम सर्व देश भोगत असल्याचं खान यावेळी म्हणाले. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात 25 जवान शहीद झाले होते. त्यावेळी काही जवानांची गुप्तांगं कापल्याचं समोर आलं होतं. त्याचाच आधार घेत आझम खान यांनी हे वक्तव्य केलं. मात्र, खान यांनी हे वक्तव्य करतांना कुठलाही ठोस पुरावा दिलेला नाही.

 

more info visit our facebook page : https://www.facebook.com/mahabatmi365/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर प्रदेशात देशातील सर्वात कमी वयाच्या कोरोना रुग्णाचा मृत्यू

News Desk

गोव्याच्या सत्तेतील भागीदार पक्ष NDA मधून बाहेर भाजपला धक्का

News Desk

आज कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवरून परतणार मायदेशी, संपूर्ण भारताचे लक्ष

News Desk