HW News Marathi
देश / विदेश

बाबा राम रहिम व पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर कनेक्शन

नवी दिल्ली- बलात्कारप्रकरणात दोषी ठरलेल्या डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमित राम रहिम व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक समान धागा असल्याची समोर आली आहे. मोदी ज्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत तेच हेलिकॉप्टर बाबा राम रहिम यांना जेलमध्ये सोडण्यासाठी वापरण्यात आल्याची बाब समोर येत आहे. या घटनेमुळे मोदींचे बाबाशी नाते जोडण्यात आले आहे असून सोशल मीडियावरून हरियाणा सरकारवर टीका होत आहे. दरम्यान हे हेलिकॉप्टर उद्योगपती अदानी यांच्या मालकाचे असल्याचे बोलले जात आहे.

बाबा राम रहिम याला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्याला अटक करून त्याची रवानगी रोहतक कारागृहात करण्यात आली. बाबा राम रहिम यांना रोहतक येथे नेण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करावा लागला. मात्र, आता या हेलिकॉप्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावरून वाद निर्माण झाला आहे. हे हेलिकॉप्टर उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीचे असून, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याच हेलिकॉप्टरमधून प्रवास केल्याचे बोलले जात आहे. बाबा राम रहिम यांना कारागृहात नेण्यासाठी वापरण्यात आलेलेAW-139 हेलिकॉप्टरमधून 2014 मध्ये मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी हे हेलिकॉप्टर वापरले होते. त्यामुळे सोशल मीडियावर बाबा राम रहिम यांच्या दिमतीला मोदींसारख्या महत्त्वाच्या व्यक्तींसाठी राखून ठेवण्यात आलेले हेलिकॉप्टर देण्यात आल्याची चर्चा रंगली होती. हेलिकॉप्टरवरील क्रमांकात असणाऱ्या साधर्म्यामुळे विरोधकांनी हरयाणा सरकारवर टीका होत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुषमा स्वराज यांना ‘पंतप्रधान’पदाचा उमेदवार म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी दिला पाठिंबा

News Desk

एअर स्ट्राईकमध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र अमित कुलकर्णी यांचा समावेश

News Desk

अखेर ‘सीसीडी’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

News Desk