HW News Marathi
देश / विदेश

एअर स्ट्राईकमध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र अमित कुलकर्णी यांचा समावेश

मुंबई | पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय वायू दलाने केलेल्या दमदार कारवाईनंतर भारतीय सैन्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. जशी ही संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहेच तशीच महाराष्ट्रासाठीही ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. भारतीय हवाई दलाच्या या कारवाईत महाराष्ट्रातील कुरुंदवाड येथील मराठमोळे स्कॉड्रन लीडर अमित हरिभाऊ कुलकर्णी यांचा देखील सहभाग होता.

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशावरून कुरूंदवाडचे अमित कुलकर्णी हवाई दलाच्या या ताफ्यात सहभागी झाले होते. आपल्या गावाचा सुपुत्र अमित इतक्या मोठ्या कारवाईत सहभागी होता ही माहिती मिळाल्यानंतर कुरुंदवाडमध्ये अत्यंत जल्लोषाचे वातावरण आहे. सोशल मीडियावरून अमित यांच्या शौर्याला सलाम केला जात आहे.

अमित कुलकर्णी यांचा अल्प परिचय

अमित कुलकर्णी यांचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक ३ मध्ये झाले. त्यानंतर सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सातारा सैनिक शाळेत झाले. खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीत अमित यांनी उर्वरित शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २००१ साली अमित कुलकर्णी हवाईदलात दाखल झाले. अमित कुलकर्णी हे आपली पत्नी-मुलासह जम्मू-काश्मीर येथेच वास्तव्यास आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील सत्तांतरावरील आजची सुनावणी संपली; सर्वोच्च न्यायालयात ‘या’ तारखेला होणार सुनावणी

Aprna

इंडोनेशियात भूकंप आणि त्‍सुनामीमुळे हाहाकार

News Desk

पंकजा म्हणतात, मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन ? 

News Desk