HW News Marathi
देश / विदेश

उद्या बाबरी खटल्यावर सीबीआयचे न्यायालय निकाल देणार, आरोपींना हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली | बाबरी खटल्यावर सीबीआयचे न्यायालय उद्या (३० सप्टेंबर) निकाल देणार आहे. यावेळी न्यायालयाने सर्व आरोपींना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार, कल्याण सिंह यांसारख्या मोठ्या राजकीय व्यक्तींसह एकूण ३२ जण आरोपी आहेत. कोरोना महामारी लक्षात घेता यातील काही आरोपींनी निकालवेळी प्रत्यक्ष हजर न राहण्याची परवानगी मिळण्याची विनंती केल्यास, तशी मुभाही न्यायालयाकडून मिळू शकते.

देशात वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना प्रत्यक्षात हजर न राहण्याची परवानगी मिळू शकते. तशी विनंतीही आडवाणी, जोशी यांचे वकील के. के. मिश्रा न्यायालयाला करणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रत्यक्ष हजर राहण्यापेक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी देण्याची विनंतीही ते कोर्टाला करु शकतात. तसेच शिवसेना नेते विनय कटियार, श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांनी सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहू शकणार नसल्याचे न्यायालयाला यापूर्वीच सांगितलं आहे. तर लल्लू सिंह कोरोनाग्रस्त आहेत, तर महंत नृत्यगोपाल दास विलगीकरणात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

swarit

काही लोकांनी तर माझा मृत्यू व्हावा म्हणून ट्विट करुन प्रार्थनाही केली

News Desk

#NirbhayaCase : आरोपी पवन गुप्ताच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

swarit