HW News Marathi
देश / विदेश

काही लोकांनी तर माझा मृत्यू व्हावा म्हणून ट्विट करुन प्रार्थनाही केली

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तब्येत ठिक नसल्याच्या अफवा सोशल मिडीयावर येत होत्या. त्यांचे निरसण स्वत: अमित शाह यांनी केले आहे. ट्विटवरुन आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन त्यांनी केले आहे. ट्विटवर त्यांनी निवेदनातून अफवा पसरवणाऱ्यांनाही सुनावले आहे.

मागील काही आठवड्यांपासून माझ्या तब्बेतीसंदर्भात सोशल मिडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. काही लोकांनी तर माझा मृत्यू व्हावा म्हणून ट्विट करुन प्रार्थनाही केली अशी सुरुवात करत अमित शाह यांनी कामात व्यस्त असल्याने आपण या अफवांकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटले आहे.

मात्र पक्ष कार्यकर्ते आणि शुभचिंतकांच्या काळजीपोटी आज आपण ठणठणीत असल्याचे मला सांगावे लागत असल्याचेही शाह यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी ट्विटवरुन ‘माझ्या तब्बेतीची चिंता करणाऱ्या सर्वांसाठी माझा संदेश’ या कॅप्शनसहीत एक निवेदन लिहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरातसाठी भाजपच्या ‘स्टार’ प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांचा समावेश

Darrell Miranda

‘खेलरत्न पुरस्कारचं नामकरण ही लोकभावना नसून हा तर राजकीय खेळ’, संजय राऊतांची मोदींवर टीका

News Desk

देशात पहिल्यांदच केली जाणार ‘श्रमगणना’

News Desk