नरोडा | गुजरातमध्ये स्थानिक प्रश्न घेऊन नरोड्याच्या आमदारांच्या कार्यालयामध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्या नीतू तेजवानी भाजपचे आमदार बलराम थवानी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यावर बेदम मारहाण केली होती. या प्रकारानंतर आता भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही नेत्यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. तसेच नीतू या माझ्या बहिणीप्रमाणे असल्याचे सांगत बलराम यांनी सांगत नीतू यांच्याकडून राखीच बांधून घेतल्यानंतर दिवसभर पेटलेल्या वादावर पडदा पडला आहे.
Balram Thawani, BJP MLA who was caught on camera kicking a woman NCP leader in Naroda: She's like my sister, I have apologized to her for what happened yesterday. We have cleared out the misunderstandings between us. I have promised to help her if she ever needs any help #Gujarat pic.twitter.com/sAF9Jm6ZXB
— ANI (@ANI) June 3, 2019
नीतू ही मला माझ्या बहिणीसारखी आहे. तिच्यासोबत झालेल्या मारहाण प्रकाराबद्दल मी तिची माफी मागतो. आमच्या दोघांमध्ये गैरसमजूतीतून हा प्रकार घडला होता. यापुढे तिला कुठ लिही मदत लागल्यास मी सदैव तिच्या पाठिशी असल्याचे भाजप आमदार बलराम थवानी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. तसेच नीत मारहाण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना पाहण्यासाठी थवानी रुग्णालयात जाऊन त्यांची यांची भेट घेतली. यावेळी नीतू यांच्याकडून राखीही बांधण्यासाठी आलो असून नीतू यांनीही झाले गेले विसरून बलराम यांना राखी बांधली.
नेमके काय आहे प्रकरण
राष्ट्रवादीच्या नेत्या नीतू तेजवानी काल ( २ जून) आमदार बलराम थवानी यांच्या कार्यालयामध्ये गेल्या होत्या. यावेळी नीतू यांनी त्यांच्या परिसरातील प्रश्नांवरून आमदारांना जाब विचारला होता. यानंतर थवानी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नीतू यांना कार्यालयाबाहेर नेहून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
#WATCH BJP's Naroda MLA Balram Thawani kicks NCP leader (Kuber Nagar Ward) Nitu Tejwani when she went to his office to meet him over a local issue yesterday. Nitu Tejwani has registered a complaint against the MLA. #Gujarat pic.twitter.com/dNH2Fgo5Vw
— ANI (@ANI) June 3, 2019
थवानी यांनी स्थानिक समस्या ऐकून न घेताच माझ्या कानशिलात मारले. जेव्हा मी खाली पडले तेव्हा त्यांनी लाथांनी मारायला सुरुवात केली. यानंतर माझ्या नवऱ्यालाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारायला सुरुवात केली. मोदींनी त्यांच्याच राज्यात महिला सुरक्षित आहेत का याचे उत्तर द्यावे, असा आरोप नीतू तेजवानी यांनी केला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.