बंगळुरु | कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये सोशल मीडिया पोस्टवरुन हिंसाचार झाला आहे. कॉंग्रेसचे आमदार श्रीनिवास मुर्ती यांच्या भाच्याने केलेल्या फेसबुक पोस्टनंतर हा हिंसाचार घडला. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी फायरिंग केली असून त्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० पोलिस गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, पोलिसांच्या गाड्याही जमावाने जाळल्या आहेत. जवळपास २००-२५० गाड्या जाळल्या असल्याचे माहिती पोलिस कमिशनर कमल पंत यांनी दिली आहे. सोशल मीडियावर मोहम्मद पैगंबर यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह्य पोस्ट लिहिल्यामुळे काँग्रेस आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या भाच्याला अटक करण्यात आली आहे.
Three people have died. Around 60 policemen injured, they've sustained stone injuries. Police vehicles were damaged & set on fire. A group entered a basement area where 200-250 vehicles were set on fire. Investigation on: Kamal Pant, Bengaluru City Police Commissioner pic.twitter.com/JrPUGsJDN7
— ANI (@ANI) August 12, 2020
श्रीनिवास मूर्ती यांच्या भाच्याने मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुस्लिम समुदायातील शेकडो लोकांनी श्रीनिवास मूर्ती यांच्या घरासमोर गर्दी केली. संतप्त जमावाने मूर्ती यांच्या घरावर दगडफेक केली. इतकेच नाही तर तिथे असलेल्या गाड्यांना आगही लावली. त्यानंतर संतप्त जमावाने आपाल मोर्चा डीजे हल्ली पोलीस स्थानकाकडे वळवला आणि तिथे तोडफोड केली.
संतप्त जमावाची आक्रमकता आणि उफाळलेला हिंसाचार शांत करण्यासाठी पोलिसांना फायरिंग करावी लागली. या फायरिंगमध्ये ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंगळुरूत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. याशिवाय डी. जे. हल्ली आणि के. जे. हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे.
Karnataka: DJ Halli Police Station in Bengaluru city vandalised last night, as violence broke out over an alleged inciting social media post.
Sec 144 imposed in city, curfew in DJ Halli & KG Halli police station limits. At least 2 dead, 110 arrested, 60 Police personnel injured. pic.twitter.com/FVgUIanWgd
— ANI (@ANI) August 12, 2020
काँग्रेस आमदार श्रीनिवास मूर्ती यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, ‘मी अखंड श्रीनिवास मूर्ती सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की, शांतता राखा. ज्याने ही चूक केली आहे, त्यासोबत चर्चा करून मी हे प्रकरण सोडवेल.’ सोशल मीडिया पोस्टवरून उफाळलेल्या या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील अमीर-ए-शरीयतने देखील शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. राज्याचे गृहमंत्री बासवराज बोम्मई यांनी सांगितलं की, हिंसेत सहभागी असणाऱ्या लोकांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई होईल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.