HW News Marathi
देश / विदेश

शरण या अथवा मृत्यूस सामोरे जाण्यास तयार राहा, भारतीय लष्कराचा इशारा

श्रीनगर | “दहशतवाद्यांनी एकतर हत्यारे टाकून शरण यावे अथवा त्यांनी त्यांच्या मृत्यूस सामोरे जाण्यास तयार राहावे”, असा स्पष्ट इशारा भारतीय लष्कराकडून पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचा वरदहस्त असून जैश-ए-मोहम्मद ही पाकिस्तानी सैन्याचे अपत्य असल्याचे भारतीय लष्कराने सांगितले आहे. भारतीय लष्कराने घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दहशतवाद्यांना हा इशारा देण्यात आला आहे.

“भारतीय लष्कराकडून जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझीचा खात्मा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे येत्या काळातही दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली जाईल. काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा केला जाईल. कोणालाही जिवंत सोडणार नाही”, असेही भारतीय लष्कराने ठणकावून सांगितले आहे.

“किती गाझी आले अन् किती गेले. आम्ही घुसखोरी करू पाहणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा करणारच. कोणाचीही गय केली जाणार नाही”, असा इशारा लेफ्टनंट जनरल ढिल्लन यांनी यावेळी दिला आहे. “भारतीय लष्कराकडून २०१८ साली जैश-ए-मोहम्मदच्या ५६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. २०१९ मध्ये आतापर्यंत एकूण ३१ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे त्यापैकी १२ दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे आहेत”, अशी माहिती काश्मीर पोलीसचे आयजी एसपी पाणि यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

INX Media Case : चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा नाही, तर ईडीकडून लूकआऊट नोटीस

News Desk

रमजानच्या काळात अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई होणार नाही  

News Desk

पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदीदरम्यान ४ संशयित ताब्यात

News Desk