HW News Marathi
देश / विदेश

युद्धासाठी सज्ज राहा, चीनच्या सैन्याला आदेश

नवी दिल्ली | चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिनी सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. शिन्हुआने या चीनच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या चिनी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली आहे. या बैठकीत त्यांनी आपल्या सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. चीन-अमेरिका यांच्यातील तणावात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे चित्र आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग यांनी हे आदेश दिले आहेत.

चिनी सैन्याने नव्या युगातील जबाबदाऱ्या उचलण्यासाठी त्याचप्रमाणे युद्धसाठीची अत्यावश्यक योजना आखणे महत्त्वाचे आहे. गेल्या शंभर वर्षांत झाले नाही असे बदल आज जगात होत आहेत. आपत्तीजन्य परिस्थितीत ताबडतोब प्रतिसाद देता येईल, याकरिता सैन्याने सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. चिनी सैन्याने संयुक्त मोहिमांची क्षमता अधिक वाढविणे त्याचप्रमाणे नव्या लढाऊ तुकड्या उभारणे अत्यंत आवश्यक आहे, अशा सूचना शी जिनपिंग यांनी केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेंगळुरूमध्ये पावसाने घेतले पाच बळी

News Desk

छत्तीसगढमध्ये निवडणुकीच्या एक दिवस आधी नक्षलवादी हल्ला

News Desk

पक्षाला मोठ्या बदलांची गरज, सोनिया गांधींना नेत्यांनी २३ लिहिले पत्र

News Desk