HW News Marathi
देश / विदेश

मोदींच्या वाढदिवसापूर्वी कॉँग्रेसने वाटले ‘अच्छे दिन’चे लाडू

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर जाऊन ग्राहकांना ‘अच्छे दिन लाडू आणि चॉकलेट’ चे वाटप करून मोदींचा वाढदिवस साजरा केला. अशा पद्धतीने भाजप सरकारने जनतेवर महागाई, पेट्रोल डिझेलची दरवाढ लादल्याच्याविरोधात उपहासात्मक निषेध नोंदवण्यात आला.

दुसरीकडे ठाणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने महागाईविरोधात आंदोलन केले. दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल- डिझेलचे दर, घरगुती गॅसची दरवाढ, अन्नधान्याच्या वाढत असलेल्या किमती आणि लोडशेडिंग याविरोधात निषेध व्यक्त करण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढला. मोर्चेकºयांनी मासुंदा तलाव येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन या सत्ताधाºयांना सद्बुद्धी द्या, अशी विनंती करत आपला निषेध व्यक्त केला. या मोर्चाच्या निमित्ताने ही अंगडाई आहे, मोठी लढाई तर पुढे सुरू होणार आहे. ज्या दिवशी भारतातील जनता रस्त्यावर उतरून आक्रोशाचा आगडोंब उभा करेल; त्या दिवशी या भाजपाला कळेल की भारतीय जनता पेटून उठते तेव्हा केवळ आग पेटते, असे आव्हाड यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सौदीच्या राजपुत्राला पाकने दिली ‘गोल्डन प्लेटेड सबमशीन गन’

News Desk

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३१ वर ! देशात सर्वाधिक कोरोनारूग्ण महाराष्ट्रात

Arati More

भारताच्या सर्वात वजनदार जीसॅट-११ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

News Desk