HW News Marathi
देश / विदेश

कर्नाटकात सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी येडियुरप्पा राज्यपालाच्या भेटीला

नवी दिल्ली | कर्नाटकात येडियुरप्पा आज (२६ जुलै) मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येडियुरप्पा आज राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. यासाठी येडियुरप्पा राजभवनात राज्यपालाच्या भेटीला गेले आहेत. जे.जी नड्डा आज दुपारी ३.३० वाजता अधिकृत घोषणार करणार असल्याची माहिती मिळाली आहे. येडियुरप्पा सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडू मिळाली आहे.

“राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार असून आज शपथ विधीसोहळा घेण्याचे सांगणार असल्याचे येडियुरप्पा यांनी राज्यपालांच्या भेटीला जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले.” राज्यपालांची भेट घेऊन येडियुरप्पा त्यांना १०५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र सोपवणार असून, त्यात ते सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी येडियुरप्पा यांना त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहेत. भाजप आमदारांपैकी ५६ ज्येष्ठ आमदारांनाही मंत्रीपद हवे आहेत. त्याशिवाय १५ बंडखोर आमदारांपैकी काही जणांना महत्त्वाची पदे द्यावी लागतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मानहानी प्रकरणी राहुल गांधींना सूरत न्यायालयाकडून जामीन मंजूर; जाणून घ्या संपर्ण प्रकरण

Aprna

कर्ज हप्त्यांच्या स्थगितीला २ वर्ष मुदतवाढ द्यावी, केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

News Desk

पेट्रोल-डिझेलची दरवाढ आजही कायम

News Desk