HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानमध्ये आजही जीवंत आहे भगतसिंग 

अपर्णा गोतपागर | भारत-पाकिस्तान यांचे संबंध हे कधीही तितकेसे चांगले राहिलेले नाहीत. पाककडून नेहमी शस्र संधीचे उल्लंघन केले जाते. भारतीय लष्करही वेळोवेळी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देते. भारत-पाकिस्तान सीमांवरील चकमकींमध्ये दोन्ही देशांचे कित्येक सैनिक शहिद होतात. हे सर्व जरी सत्य असले तरी काही वर्षांपूर्वी हे दोन्हीही देश एकत्रच नांदत होते ही वस्तुस्थिती आपण कधीही अमान्य करू शकत नाही. पाकिस्तान जरी भारताचे शत्रू राष्ट्र म्हणून प्रचलित असले तरीही याच पाकिस्तानमध्ये भारतीय क्रांतिकारक भगतसिंग यांना मोठ्या प्रमाणावर मानले जाते. २७ सप्टेंबर १९०७ रोजी पाकमधील पंजाब प्रांततील फैसलाबाद तालुक्यात (त्या काळातील लायलपूर) भारतीय क्रांतीकारी भगत सिंग यांचा जन्म झाला. आजही पाकिस्तानमधील फैसलाबादमध्ये गेल्यानंतर भारत-पाक या दोन्ही देशातील तणाव विसरून जायला होते.

पाकिस्तानमधील भगतसिंगच्या गावाचे नाव भगतपूर

फैसलाबाद तालुक्यात क्रांतीकारी भगतसिंग यांचे ‘बंग’ हे गाव लागते. बंग या गावाला भगतसिंग यांच्या नावावरून भगतपूर असे नाव देण्यात आले आहे. भगतसिंग यांचे वडिलोपार्जित गाव हे आता फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेले आहे. पाकिस्तानच्या बंग गावातील लोक हे क्रांतिकारी भगतसिंग यांना आपल्याच मातीचे पुत्र मानतात. भगतसिंग यांच्या कट्टर ब्रिटिश विरोधी धोरणामुळे भगतपूर (बंग) या गावाचे लोक हे भगतसिंग यांना हिरो मानतात. ते मानतात कि, “स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात जोपर्यंत क्रांतिकारी भगतसिंग यांचे नाव येत नाही तोपर्यंत स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Goodbye2019 : देशासह राज्यातील ‘या’ वर्षातील महत्त्वाच्या घडामोडी

News Desk

नेपाळी तरुणीला झाडावर बांधून चार तास बलात्कार

News Desk

फडणवीसांचा दिल्लीत मेट्रोने प्रवास पण टीका मुंबईच्या मेट्रोवर

News Desk