नवी दिल्ली | भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. दुसऱ्या लाटेतच देश हतबल झाला आहे तर तिसऱ्या लाटेत काय होणार याची काळजी भेडसावत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा धोका वैद्यकीय क्षेत्राकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीची २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणी करण्याची शिफारस तज्ञ समितीने केली होती. दरम्यान डीसीजीआयने कोव्हॅक्सिनच्या फेज II / III च्या क्लिनिकल चाचणीस मान्यता दिली. भारत बायोटेक ५२५ निरोगी स्वयंसेवकांवर चाचण्या घेणार आहे.
दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, पाटण्यातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूरची ‘मेडीट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या संस्थांमध्ये ५२५ मुलांवर या चाचण्या करण्यात येणार असून केंद्रीय औषध प्रमाणन नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने मंगळवारी भारत बायोटेकच्या लसीच्या चाचण्या मुलांवर करण्याबाबत चर्चा केली होती.
भारत बायोटेकने २ ते १८ वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिनच्या चाचण्या करण्यासाठी परवानगी मागितली होती. सविस्तर चर्चेनंतर समितीने २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लशीच्या चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांच्या सुरक्षेची माहिती जाहीर केल्यानंतर समिती तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची शिफारस करणार आहे. लशीच्या मुलांवर चाचण्या करण्यावर २४ फेब्रुवारी रोजी चर्चा झाली होती त्या वेळी कंपनीला सुधारित वैद्यकीय चाचण्या संचालन प्रक्रिया सादर करण्यास सांगण्यात आले होते.
Drugs Controller General of India (DCGI) approves Phase II/III clinical trial of COVAXIN in the age group of 2 to 18 years. Bharat Biotech to conduct trials in 525 healthy volunteers pic.twitter.com/ibxAW97bAc
— ANI (@ANI) May 13, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.