HW Marathi
देश / विदेश राजकारण

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दीड वर्षातच दिला राजीनामा

भोपाळ | एकीकडे देशात कोरोनाचे संकट आहे तर दुसरीकडे राजकीय वर्तृळात अनेक घडामोडी घडत आहेत. आज (२० मार्च) बहुमत चाचणीआधीच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी अवघ्या दीड वर्षातच राजीनामा दिला आहे. कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. आणि त्यानंतर राज्यपालांकडे जाऊन त्यांनी राजीनामा सोपवला. काँग्रेसच्या आमदारांच्या राजीनाम्यानंतर भाजपने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन मध्य प्रदेश विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली होती. यावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. परंतु त्याआधीच कमलनाथ यांनी राजीनामा दिला.

पत्रकार परिषदेत कमलनाथ यांनी भाजपवर अनेक आरोप केले. भाजपने लोकशाहीचा गळा घोटला, असेही ते म्हणाले. “भाजपला जनता कधीच माफ करणार नाही, असेही ते म्हणाले. १५ महिन्यांत आम्ही मध्यप्रदेश माफिया मुक्त केला. १५ वर्षांच्या भाजपच्या कार्यकाळात काय झाले हे प्रत्येक नागरिकाला माहित आहेच. राज्याच्या जनतेचा विश्वासघात झाला आहे. अडीच महिने लोकसभा निवडणूक आणि आचारसंहितेत गेले. राज्याचा प्रत्येक नागरिक साक्षीदार आहे की, मी जनतेच्या हितासाठी कार्य केले आहे. पण भाजपच्या हे पचनी पडलेलं नाही. त्यामुळे त्यांनी आमच्याविरोधात सातत्याने काम केले,” अशा शब्दांत त्यांनी भाजपला टोले लगवाले.

Related posts

राजकारण करून लोकांच्या भावनांशी खेळून त्यांच्या जीवाचा खेळ मांडू नका

News Desk

पक्ष दोषी नसतो, नेतृत्व करणाऱ्याचे चुकते !

News Desk

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद

News Desk