भुवनेश्वर | बंगाल उपसागरात उसळलेले ‘फनी’ चक्रीवादळ आज (३ मे) ओडिशा किनारपट्टीवर धडकले आहे. या वादळाने संपूर्ण ओडिशातील पुरीच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घातलेला आहे. या वादळात भुवनेश्वरच्या रेल्वे रुग्णालयामध्ये एका मुलीचा जन्म झाला आहे. यात महत्त्वाचे म्हणजे या मुलीला ‘फनी’ या वादळाचे नाव देण्यात आले आहेत.
Bhubaneswar: A 32-year-old woman gave birth to a baby girl in Railway Hospital today at 11:03 AM. Baby has been named after the cyclonic storm, Fani. The woman is a railway employee, working as a helper at Coach Repair Workshop, Mancheswar. Both the mother&child are fine. #Odisha pic.twitter.com/xHGTkFPlAe
— ANI (@ANI) May 3, 2019
भुवनेश्वरच्या रेल्वे रुग्णालयामध्ये एका ३२ वर्षीय महिलेने आज सकाळी ११च्या सुमारास कन्यारत्न जन्म दिला आहे. फनी वादळाच्या तडाख्यात ओडिसा सापडलेले असताना या कुटुंबामध्ये आनंदाचे वादळ आले. ही महिला रेल्वेची कर्मचारी आहे. कोच दुरुस्ती कारखान्यामध्ये ती मदतनीस म्हणून काम करते.
फनीच्या तडाख्यात सापडलेल्या १२ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. ओडिशामध्ये तीन जणांचा वादळामुळे मृत्यू झाला असून १६० जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या तीन दशकातील ओडिशामधील हे सर्वात मोठे वादळ असून या वादळामुळे राज्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच वाऱ्याचा वेग १७५ ते २०० किमी प्रती तास एवढा प्रचंड होता. १९९९ नंतर आलेले हे सर्वात शक्तीशाली वादळ आहे. भुवनेश्वरच्या विमानतळाच्या इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.