मुंबई :- काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. बेंगळुरू न्यालयानं कॉपीराइट नियम उल्लंघनाच्या आरोपावरून काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्याचा आदेश सोमवारी दिला होता. त्या निर्णयाला कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली आहे. हा निर्णय काँग्रेससाठी एक मोठा दिलासा मानला जात आहे.
KGF-चॅप्टर 2 या चित्रपटाच्या म्युझिकचा वापर केल्यामुळे कॉपीराइटचे उल्लंघन झाल्याचा बंगळुरू न्यायालयाकडून सांगण्यात आला होता. त्यामुळे काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे आदेश बंगळुरू न्यालयाने दिले होते. परंतु, या निर्णयाला कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थागिती दिली आहे. ट्विटर, फेसबुक, यूट्यूब व इंस्टाग्रामवरून कॉपीराइटचं उल्लंघन केलेली सर्व सामग्री हटवा, असे निर्देश देत न्यायालयाने काँग्रेसला हा दिलासा दिला. या निर्णयानंतर काँग्रेसतर्फे ट्विट करत कोर्टाच्या या निर्णयाचे आभार मानले आहेत. त्यांच्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, “आम्ही माननीय न्यायालयाचे त्यांच्या शहाणपणाबद्दल आभार मानतो आणि न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करू. आम्ही सामान्य लोकांसाठी लढत राहू”, असे काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Karnataka High Court has set aside the exparte order of a Bengaluru Court which ordered blocking of @INCIndia & @bharatjodo handles.
We thank the honourable court for their wisdom and will comply with the directions of the court.
We will continue to fight for the common people.
— Congress (@INCIndia) November 8, 2022
देशात सध्या काँग्रेसची राहुल गांधींच्या नेतृवतात ‘भारत जोडो ‘ यात्रा सुरु असून ही यात्रा तेलंगणामार्गे नांदेडच्या देगलूरमध्ये सोमवारी (7 नोव्हेंबर) राजी दाखल झाली. यावेळी राहुल गांधी यांनी हातात मशाल घेत महाराष्ट्रात प्रवेश केला. राहुल गांधींसोबत हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात यात्रेला प्रारंभ केला. ही यात्रा महाराष्ट्रात 14 दिवस असणार आहे. राहुल गांधींची ही यात्रा (७ सप्टेंबर) कन्याकुमारी येथून सुरू झाली होती. ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर असा ३ हजार ५७० किलोमीटरचा प्रवास असणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.