HW News Marathi
देश / विदेश

रॉबर्ट वाड्रा यांना मोठा दिलासा, जप्त करण्यात आलेले दस्तावेज परत करण्याचे निर्देश

नवी दिल्ली | पूर्व उत्तर प्रदेशातील महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर मनी लाँडरिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ७ डिसेंबर, २०१८ मध्‍ये दिल्‍लीच्या कार्यालयात छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान वाड्रा यांच्या कार्यालयातील सर्व दस्‍तावेज आणि त्याच्या प्रती (सॉफ्‍ट आणि हार्ड कॉपी) त्यांना परत कराव्यात, असे निर्देश दिल्‍लीच्‍या पटियाला हाऊस न्यायालयाने सोमवारी (२५ फेब्रुवारी) अंमलबजावणी संचालनालयास (ईडी) दिला आहेत.

या प्रकरणी विशेष न्‍यायाधीस अरविंद कुमार यांनी ईडीला निर्देश दिले आहेत की जप्‍त केलेले दस्‍तावेज त्‍यांना परत करावेत. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) वाड्रा यांची चौकशी करण्‍यात आली आहे. ज्‍या जप्‍त केलेल्‍या दस्‍तावेजच्‍या आधारे ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्‍या दस्‍तावेजाच्‍या प्रती मिळण्‍यासाठी रॉबर्ट वाड्रा यांनी शनिवारी (२३ फेब्रुवारी ) कोर्टाकडे याचिका दाखल केली होती. दस्‍तावेज प्रती मिळेपर्यंत ईडीकडून होणारी चौकशी थांबवावी, अशी मागणी वाड्रा यांनी केली आहे. याचिकेवर आज दुपारी दोन वाजता झालेल्या सुनावणीदरम्यान हा निर्देश देण्यात आले आहे. दिल्‍ली न्यायालयाने पाच दिवसांच्‍या आत दस्‍तावेजच्‍या सर्व प्रती वाड्रा यांना उपलब्‍ध करुन देण्‍याचे निर्देश ईडीला देण्‍यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार खासदारांची नियुक्ती

News Desk

आयसीस कडून अमेरीकेत दशहतवादी हल्ला 

News Desk

बदलीच्या रागातूनच परमबीर सिंह यांनी माझ्यावर ‘ते’ आरोप केले !

News Desk