HW News Marathi
देश / विदेश

केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार, बिहार निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याची शक्यता!

नवी दिल्ली | आज (२५ सप्टेंबर) दुपारी १२.३० वाजता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. देशात कोरोनाचा धोका वाढलेला असताना या पहिल्याच मोठ्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे वेगळंच आव्हान निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांसमोरही असणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये तीन टप्प्यांत निवडणुका होऊ शकतात. गेल्या निवडणुकीत पाच टप्प्यांत मतदान पार पडलं होतं. यंदा निवडणुकीत कोरोना गार्डलाईन्सचा पालन हेच मोठं आव्हान ठरणार आहे.२९ नोव्हेंबरला बिहार विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. तसेच, बिगर विधानसभेत आज मध्यप्रदेश मधल्या पोट निवडणुकाही जाहीर होण्याची शक्यता आहे.बिहार विधानसभेत सोबत आज मध्यप्रदेश मधल्या पोटनिवडणुकाही जाहीर होण्याची शक्यता. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडानंतर जवळपास २७ जागांवर निवडणुका अपेक्षित आहेत. तसेच, मध्यप्रदेश साठी मिनी विधानसभा असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज नीरव मोदीच्या जामीनप्रकरणी वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयात सुनावणी

News Desk

इस्त्रोचा आणखी एक इतिहास, एमिसॅट उपग्रहाचे अंतराळात झेप

News Desk

सोहराबुद्दीन बनावट एन्काउंटर प्रकरणी आज होणार अंतिम निर्णय

News Desk