HW News Marathi
देश / विदेश

जगातील पहिल्या डिझायनर बाळाचा जन्म, चिनी शास्त्रज्ञांचा अनोख्या प्रयोगाचा दावा

नवी दिल्ली | चीनच्या अनेक प्रयोगांनी जगाला बुचकळ्यात पाडले आहे. आता चीनच्या शास्त्रज्ञांनी आणखी एक अनोखा, आश्चर्यकारक असा शोध लावला आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी डीएनएमध्ये काही विशिष्ट बदल करुन एचआयव्ही आणि कॉलरासारख्या रोगांपासून मुक्त असे बाळाचा जन्म झाल्याचा दावा केला आहे. आता तुम्हाला हव्या तशा गुटगुटीत, सुंदर, निरोगी आणि गोंडस बाळाचा जन्म होऊ शकतो. यालाच ‘जेनेटिकली मॉडिफाईड किंवा डिझायनर बाळ’ अशी संज्ञा देण्यात आली आहे.

जगभरातील शास्त्रज्ञांकडून या प्रयोगाबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काही शास्त्रज्ञांच्या मते हा प्रयोग निसर्गाच्या नियमाविरुद्ध आहे. चिनी शास्त्रज्ञांकडून मात्र याचे एक अजब कारण देण्यात आले आहे. चीनच्या या प्रयोगाचा उद्देश जेनेटिकली मॉडिफाईड बाळ तयार करणे नव्हे तर रोगमुक्तीच्या दिशेने पहिला प्रयत्न आहे, असा युक्तिवाद चिनी शास्त्रज्ञांकडून केला जात आहे. मात्र, भविष्यात या प्रयोगाचे परिणाम हे अत्यंत भयंकर देखील असू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपाचारासाठी ५० रुपये कमी पडल्याने बाळाचा मृत्यू

News Desk

बांगलादेशामध्ये विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न

News Desk

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना EDने ‘या’ प्रकरणी बजावली नोटीस

Aprna