नवी दिल्ली | जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चपासून रामलीला मैदानावर उपोषणाला बसले आहेत. अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेण्यासाठी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटी अण्णा हजारे यांच्या नक्की कोणत्या मागण्या मान्य होणार आहेत. आणि अण्णा हजारे यांच्या मागण्या स्वरुपात देण्यात येणार आहेत. याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.
गेल्या चार दिवसापासून अण्णा हजारे यांचे चाडे चार किलो वजन कमी झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. जनलोकपालची अंमबलजावणी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणुकी संदर्भातील मागण्यांसाठी अण्णा हजारे उपोषणाला बसले आहे. तसेच मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय भेटायला येऊ नका, मी त्याशिवाय कोणाशीही चर्चा करणार नाही, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.