HW Marathi
देश / विदेश राजकारण

आमदार फोडण्यासाठी भाजपकडून प्रत्येकी २ कोटींचे आमिष !

नवी दिल्ली | देशातील लोकसभा निवडणुकांच्या प्रचारापासून पश्चिम बंगालमध्ये टीएमसी विरुद्ध भाजप या संघर्षाने मोठे हिंसक वळण घेतले आहे. लोकसभेच्या निकालाला जवळपास २ महिन्यांचा काळ उलटून गेला असला तरीही अद्याप या पक्षांमध्ये धुसफूस सुरूच आहे. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा आक्रमक होत भाजपवर निशाणा साधला आहे. “संपूर्ण देशात भाजप फोडाफोडीचे राजकारण करत असून आमदारांना प्रत्येकी २ कोटी रुपयांचे आमिष दाखवत आहे”, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

“भाजप संपूर्ण देशात सध्या फोडाफोडीचे राजकारण करत आहे. आमदार फोडण्यासाठी भाजपकडून त्यांना प्रत्येकी २ कोटी रुपये व पेट्रोलपंप देण्याचे आमिष दाखविले जात आहे”, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून टीएमसीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर देखील ममता बॅनर्जी यांनी भाष्य केले आहे. “२०१९ ची लोकसभा निवडणूक भाजपने ईव्हीएम, निवडणूक आयोगाचा वापर करून घेत लबाडी करून जिंकली”, असाही आरोप यावेळी ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

Related posts

पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास

Gauri Tilekar

मोदींना स्किझोफ्रेनिया झालाय का ?, राहुल गांधींचा सवाल

News Desk

सरकार फक्त निवडणुका जिंकण्यामागे लागले आहे !

News Desk