मुंबई | जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितनीने फेटाळला आहे. या संपूर्ण प्रकरणात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू कारणीभूत असल्याचे ट्विट भाजपने केले आहे.
पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाईंड जैश-ए-मोहम्मद या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स संयुक्त राष्ट्रसंघाकडे प्रस्ताव मांडला होता. परंतु या प्रस्तावाविरोधात चीनने नकाराधिकाराचा (व्हेटो) वापर केल्याने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने हा प्रस्ताव फेटाळाला आहे.
Weak Modi is scared of Xi. Not a word comes out of his mouth when China acts against India.
NoMo’s China Diplomacy:
1. Swing with Xi in Gujarat
2. Hug Xi in Delhi
3. Bow to Xi in China https://t.co/7QBjY4e0z3
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 14, 2019
‘‘चीनची भूमिका भारताविरोधात आहे, तरीही नरेंद्र मोदींच्या तोंडून एकही शब्द निघत नाही. चीन विरोधातील नरेंद्र मोदींचे धोरण पूर्णपणे फसले आहे, अशी टीकाही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी असे ट्विट केले आहे. राहुल यांच्या ट्विटला भाजपने प्रत्युत्तर देत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच चीनला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत स्थान मिळाले”, असे ट्विट भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आले आहे.
Insightful read on how Jawaharlal Nehru compromised India's interest with respect to UNSC. May be Rahul Gandhi should read before he tweets.
Excerpt from his letter dated Aug 2, 1955. Source: 'Letters for a Nation: From Jawaharlal Nehru to His Chief Ministers 1947-1963'. pic.twitter.com/eMthTobAO7
— BJP (@BJP4India) March 14, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.