शाहजहांपूर | भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली आहे. शहाजहांपूर येथील आश्रमातून विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज (२० सप्टेंबर) सकाळी चिन्मयानंद यांना ताब्यात घेतले. शहाजहांपूर येथील स्वत:च्या मालकीच्या लॉ कॉलेजातील विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा व तिचे लैंगिक शोषणाचा आरोप चिन्मयानंदला अटक करण्यात आली आहे.
BJP leader Swami Chinmayanand has been arrested in connection with the alleged sexual harassment of a UP law student. pic.twitter.com/6NVLU761fC
— ANI (@ANI) September 20, 2019
चिन्मयानंदवर बलात्काराच्या आरोपानंतर उत्तर प्रदेशाच्या राजकीय वादळ आले होते. या प्रकरणानंतर चिन्मयानंदच्या निर्दोष असल्याचे सांगत त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. परंतु चिन्मयानंद यांना अटक न झाल्यास आत्महत्या करण्याची धमकी पीडित मुलीने दिली होती. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण डवळून निघाले होते. आणि आज अखरे अटकेची कारवाई झाली.
Shahjahanpur: BJP leader Swami Chinmayanand has been arrested in connection with the alleged sexual harassment of a UP law student. pic.twitter.com/gxZxr81qN6
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 20, 2019
आयजी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले होते. चिन्मयानंदवर आरोप केल्यानंतर पीडित तरुणी बेपत्ता झाली होती. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीला राजस्थानमधून सापडली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.