HW Marathi
देश / विदेश राजकारण

दोन्ही हातात बंदुका घेऊन दारूच्या नशेत भाजप आमदाराचा नाच

नवी दिल्ली | भाजपचे आमदार प्रणव सिंह चॅम्पियन हे आपल्या वादग्रस्त कृत्यामुळे पुन्हा एकदा चांगलेच अडचणीत सापडले आहेत. प्रणव सिंह चॅम्पियन हे चक्क आपल्या दोन्ही हातांमध्ये बंदुका घेऊन दारुच्या नशेत नाचत असतानाचा एक वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. यापूर्वी देखील प्रणव सिंह हे एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मोठ्या वादात सापडले होते. त्या प्रकरणाची गंभीर दखल घेत पक्षाकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली होती.

प्रणव सिंह यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आपण या प्रकरणात विशेष लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे या व्हिडीओत प्रणव सिंह यांच्या हातात असलेल्या शस्त्रांचे परवाने काढण्यात आले आहेत का ? याबाबत देखील चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या व्हिडीओत प्रणव सिंह यांच्यासह त्यांचे काही समर्थक देखील दिसत आहेत. एका हातात दारूचा ग्लास आणि दुसऱ्या हातात बंदुका घेऊन बेधुंदपणे नाच करणाऱ्या प्रणव सिंह यांचा हा व्हिडीओ काहीच दिवसांपूर्वीच असल्याची माहिती मिळत आहे.

Related posts

नेत्यांच्या आवडीचा विषय म्हणजे बदल्या !

News Desk

मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर शेलारांचा माफीनामा

अपर्णा गोतपागर

राजू शेट्टींनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

News Desk