HW News Marathi
देश / विदेश

स्मृती इराणींने हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या पार्थिवाला दिला खांदा

अमेठी | नवनिर्वाचित खासदार स्मृती इराणी यांनी निकटवर्तीय सुरेंद्र प्रताप सिंह यांच्या हत्येमुळे अमेठीत खळबळ माजली आहे. अमेठीमधील बरौलिया गावातील माजी सरपंच सुरेंद्र सिंह यांचा काल (२५ मे) गोळ्या झाडून हत्या केली. स्मृती इराणींच्या जवळचे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांच्या हत्येने स्मृती इराणींना धक्का बसला. त्यांनी लगेच बरौलिया गाव गाठले आणि सुरेंद्र सिंह यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या पार्थिवाला खांदाही दिला.

सिंह यांच्या कुटुंबाची भेट घेत मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडण्यात येईल, असे आश्वासन इराणींनी दिले. सुरेंद्र सिंह हे घराबाहेर झोपले असताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्र सिंह यांना लखनऊ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संपूर्ण परिसरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

पोलिसांनी तपास कार्य सुरु केले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी काही लोकांना देखील ताब्यातही घेतले आहे. मृत सुरेंद्र सिंहच्या मुलाने यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या हत्येच्या तपासात सर्व शक्यतांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसने सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधातील महाभियोग याचिका मागे

News Desk

३६ मुले असताना पाळणा हालणार

News Desk

उद्धवजी परत फिरा.. भाजपच्या मुनगंटीवारांची उद्धव ठाकरेंना साद!

Arati More