नवी दिल्ली | दिल्लीतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक रामलीला मैदनाला माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव उत्तर दिल्ली महानगरपालिकेत भाजपच्या पाच नगरसेवकांनी दिला आहे. आता मैदानाच्या नाववरून चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत.
Delhi: North Delhi Municipal Corporation has proposed the renaming of Ramlila Maidan after former PM Atal Bihari Vajpayee. pic.twitter.com/js5bAPAyRq
— ANI (@ANI) August 25, 2018
या मैदानाला वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्तावावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी ट्विट करून म्हटले की, ‘रामलीला मैदानाचे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी नाव दिल्याने जनतेची मते मिळत नाही. कारण भाजपला आता मोदींच्या नाववर मत मिळणार नाहीत. त्यामुळे त्यांनी भाजपच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवार बदला तरच मते मिळतील, अशा शब्दा केजरीवालने मोदींवर निशाणा साधला आहे.
रामलीला मैदान इत्यादि के नाम बदलकर अटल जी के नाम पर रखने से वोट नहीं मिलेंगे
भाजपा को प्रधान मंत्री जी का नाम बदल देना चाहिए। तब शायद कुछ वोट मिल जायें। क्योंकि अब उनके अपने नाम पर तो लोग वोट नहीं दे रहे। https://t.co/156uKuTQ7V
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 25, 2018
उत्तर दिल्ली महानगरपालिकेत हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. पालिकेच्या चार ते पाच सदस्यांनी हा प्रस्ताव ठेवला आला असून या प्रस्तावावर ३० ऑगस्ट रोजी या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. रामलीला मैदानावरून दिल्लीत चांगलेच राजकारण तापल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या मुद्द्यावर अजून काय राजकारण पेटणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.