HW News Marathi
देश / विदेश

शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे अन्यथा उद्रेक होईल, उदयनराजेंचा इशारा

नवी दिल्ली | राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस आक्रमक होत चालला आहे. याच विषयासाठी आज (११ फेब्रुवारी) खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत खास भेट घेतली. या भेटीनंतर उदयनराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. वडीलकीच्या नात्याने शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात लक्ष घालावे, अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. दिल्ली येथील शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली.

उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची भेट घेतली असून आरक्षणाबाबत लक्ष घाला, अन्यथा उद्रेक होईल असं त्यांना सांगितले. आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात वकिलांकडून योग्य मांडणी झाली नाही, असंही निरीक्षण त्यांनी भेटीदरम्यान नोंदवलं. राज्य सरकारनं लवकरात लवकर योग्य तोडगा काढणं गरजेचं आहे. राज्य सरकारनं आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

शरद पवारांची भेट घेतली, मोदींची भेट घेणार का?यावेळी प्रसारमाध्यमांनी उदयनराजे भोसले यांना मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर उदयनराजे भोसले यांनी म्हटले की, “हा प्रश्न राजकीय नाही, हा राजकीय मुद्दा नाही. राजकारण कुणी आणू नये. हा विशिष्ट समाजाचा प्रश्न आहे. या समाजासाठी सत्तेत जे आहेत महाराष्ट्रात, पाहिलं तर मराठा समाजाचे सर्वाधिक आमदार आहेत. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू मांडायला हवी, ती होताना दिसत नाही.मी पवारसाहेबांना सांगितलं आपल्याकडून काही मार्गदर्शन महाराष्ट्र सरकारला दिलं पाहिजे. राज्यातील सरकार पवारसाहेबांमुळे. त्याची बांधणी पवारसाहेबांनीच केली. त्यामुळे पवारसाहेबांनीच मराठा आरक्षणावर मार्ग काढायला हवा, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पेढेवाले मोदी’ म्हणणारे आणि आता इंदिराजीसुद्धा भाजपला प्रिय वाटतात, आनंद आहे…..सामनातुन टिका

Arati More

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री अमित शाहांची भेट घेणार

Aprna

पाकच्या ‘नापाक’ कारवाया सुरूच, शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन

News Desk