अहमदाबाद | “भाजप पैशाचा वापर करून कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. यापूर्वी पूर्वोत्तर भारतातही अशाच प्रकरे सत्तांतर भाजपने घडवून आणल्याचे आपण पाहिले आहे,” कर्नाटकमधील सध्याच्या राजकीय घडामोडींवर राहुल दिलेली ही पहिली प्रतिक्रिया आहे.
Rahul Gandhi on political developments in Karnataka: BJP uses money to bring down state Govts, they have been doing that. We saw that in the North east as well. pic.twitter.com/gqEav98XeU
— ANI (@ANI) July 12, 2019
अहमदाबादमधील एका न्यायालयात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यातील सुनावणीसाठी राहुल गांधी आज येथे आले होते. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे. न्यायालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी कर्नाटकातील घटनाक्रमावरून भाजपवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर येत्या मंगळवारपर्यंत (१६ जुलै) निर्णय घेऊ नका, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.