HW News Marathi
देश / विदेश

पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून बंदची हाक, सरकारी बसेसची तोडफोड

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकारने आज (बुधवारी २६ सप्टेंबर) बंदची हाक दिली आहे. बंदा दरम्यान अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी लांब पल्ल्याच्या रेले रोक केला आहे. तर भाजप कार्यकर्त्यांनी बसेसवर दगडफेक केली आहे.

बंगालमधील दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये पोलिसांसोबत झालेल्या वादाच्या दरम्यान दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये बंद पुकारला आहे. भाजपने पुकरलेला हा बंद १२ तासांचा असणार आहे. भाजप कार्यकर्त्यांनी हावडा वर्धमान मार्गावर रेले रोको केला. या व्यतिरिक्त भाजप कार्यकर्त्यांनी सियालदाह-बारासत-बोनगाव सेक्शन दरम्यान रेल्वे रोखून धरली.

बंगालमधील कूच बेहरमध्ये अनेक सरकारी बसेसवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत बसेसच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बस चालकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून हेल्मेट घालून बस चावण्यास सुरुवात केली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षात तणावाचे वातावरण दिसून येते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वाघा बॉर्डरवर ‘बीटिंग द रिट्रीट’ होणार नाही

News Desk

कर्नाटकातील बंडखोर आमदारांचा निर्णय मंगळवारी होणार | सर्वोच्च न्यायालय

News Desk

लॉकडाऊन कालावधीत रक्ताचा तुटवडा भासणार नाही !

News Desk
देश / विदेश

भगतसिंग यांना का दिली वेळेआधी फाशी ?

News Desk

पूनम कुलकर्णी | लाहोर सेंट्रल जेलमध्ये 23 मे 1931 ची सकाळ एक भयान शांतता घेऊन आली. दररोजच्या तुलनेत या दिवशी लाहोरमध्ये एक वेगळ वादळ उठले होते. जेलमधील कैद्यांना ही सकाळ काहीशी वेगळीच वाटत होती. कारण त्या दिवशी सकाळी जैलमधील सर्व कैद्यांना वॉर्डन चरणसिंग यांनी सांगितले की प्रत्येकाने आपआपल्या कोठडी मध्ये जावे. कोणत्याही कैद्याला या बाबत स्पष्ट कारण देण्यात आले नव्हते. त्यांनी केवळ इतकेच सांगितले की वरिष्ठांचे आदेश आहेत. जेल मधील कैदी विचारच करत होते की प्रकरण काय आहे ? इतक्यात जेलचा नाईक बरकत प्रत्येक खोली समोरुन काहीतरी पुटपुटत चालत गेला. तो म्हणाला, आज रात्री भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना फाशी देण्यात येणार आहे.

बरकतचे हे शब्द ऐकून कैद्यांमध्ये हालचाली सुरु झाल्या. काही कैद्यांनी बरकतला जवळ बोलवून त्याला विनंती केली. की, फाशी नंतर भगतसिंगची कोणतीही वस्तू जसे पेन, कंगवा, घड्याळ त्यांना आणून द्यावी. कारण भविष्यात आपल्या नातवंडांना आपण भगतसिंग यांच्या सोबत जेलमध्ये होतो हे सांगता येईल.

जेल अधिका-यांनी या तीनही क्रांतिकारी नेत्यांना सांगितले की, त्यांना वेळेच्या 12 तास आधी फाशी देण्यात येत आहे. दुस-या दिवशी सकाळी 6 वाजता फाशी देण्या ऐवजी आदल्या दिवशी सायंकाळी 7 वाजता त्यांना फाशी देण्यात येणार आहे. भगतसिंग मेहता यांच्या द्वारे देण्यात आलेल्या पुस्तकाची काही पानेच वाचू शकले होते. अधिका-याने दिलेली माहिती ऐकून भगतसिंग म्हणाले, काय आपण मला या पुस्तकाची काही पाने देखील वाचू देणार नाही का ? मला या पुस्तकाचा एक पाठ देखील पुर्ण वाचता येणार नाही का?

भगतसिंग यांनी जेलमध्ये सफाई कामगार असलेल्या एका मुस्लिम कर्मचा-याला फाशीच्या आदल्या दिवशी घरचे जेवण घेऊन येण्याची विनंती केली होती. मात्र एक दिवस आधी फाशी दिल्यामुळे भगतसिंग यांची ही इच्छा अपुर्णच राहीली.

अवघ्या काही वेळातच या तीनही क्रांतिकारी नेत्यांना फाशी देण्यासाठी कोठडीतून बाहेर काढण्यात आले. भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांनी हात जोडून आपले आवडते आजादी गीत गायला सुरुवात केली. कभी ओ दिन भी आयेगा, हम आझाद होंगे, ये अपनी ही जमीन होगी, आपना आसमा होगा नंतर या तिघांचे एक- एक करुन वजन करण्यात आले. त्यानंतर त्यांना शेवटची अंघोळ करुन घ्या अशा सुचना देण्यात आल्या. काळ्या रंगाचे कपडे घातलेल्या या तिघांचे चेहरे मात्र उघडे ठेवण्यात आले. जसे घड्याळात 6 वाजले तसे इतर कद्यांना जेल मधील वातावरणात बदल जाणवू लागले. बुटांचे विचित्र आवाज येऊ लागले. सर्वांना गाण्याचे सुर ऐकू येत होते.सर्फरोशी की तमन्ना, अब हमारे दिल मे है सर्वांना अचनाक इनक्लाब जिंदाबाद आणि हिंदुस्तान आझाद हो अशा घोषणा मोठ मोठ्याने ऐकू येऊ लागल्या. भगतसिंग मध्ये उभे होते. भगतिंग यांनी आपल्या आईला वचन दिले होते की फाशीच्या तक्तावरुन ते इनक्लाब जिंदाबाद च्या घोषणा देतील.

लाहोर जिल्हा कॉंग्रेसचे सचिव पिंडीदास सौंधी यांचे घर अगदीच जेलला लागून होते. भगतसिंग यांनी मोठ्या आवाजात इनक्लाब जिंदाबाद च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. सौंधी यांच्या घरापर्यंत हा आवाज पोहचेल इतक्या आवाजात हे क्रांतिकारी घोषणा देत होते. भगतसिंग यांचा आवाज ऐकून जेलमधील इतर कैदी देखील मोठ-मोठ्याने घोषणा देऊ लागले. या तीनही तरुण क्रांतिकारकांच्या गळ्यात फाशीची दोर टाकण्यात आली. तिघांचे हातपाय देखील बांधण्यात आले. तेव्हा जल्लाद ने विचारले सर्वात पहिली फाशी कुणाला द्यायची ? सुखदेव ने आपण पहिल्यांदा फाशीवर जायला सज्ज असल्याचे सांगितले. काही क्षणातच जल्लादने एक-एक करत तिघांनाही फाशी दिली.

तीनही क्रांतिकारी शहीदांच्या पार्थिवाला फिरोजपूरच्या सतलज नदीच्या किनारी आणण्यात आले. तोपर्यंत रात्रीचे दहा वाजले होते. या ठिकाणी एका पुजा-याला बोलविण्यात आले. अग्नी दिलाच होता इतक्यात ही बातमी सर्वदूर पसरली. त्यामुळे परीसरात रहाणारे लोक ब्रिटीश अधिका-यांच्या दिशेने चालत येऊ लागल्याचे त्या अधिका-यांना दिसले. लोकांचा रोष पाहून ब्रिटीश अधिकारी आपल्या वाहनांकडे धावले. संपुर्ण रात्र त्या गावातल्या नागरीकांनी या शहिदांच्या जळत असलेल्या पार्थिवाला चारही बाजूनी पाहरा दिला. अशा प्रकारे वेळे आधीच 12 तास भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना ब्रिटीश अधिका-यांनी फाशी दिली.

भगतसिंग यांना फाशी देण्यात आल्याचा उल्लेख अनेकदा पुस्तकांमध्ये आढळतो. परंतु भगतसिंग यांच्या फाशी नंतर जेलच्या मागच्या बाजूला कु-हाडीने त्यांच्या शरीराचे तुकडे करुन ते गोणीमध्ये भरुन फिरोजपुरला नेण्यात आले होते असा संदर्भ देखील अनेक पुस्तकांमध्ये वाचायला मिळतो.

एक रात्र आधीच फाशी देण्यात आली

23, मार्च 1 9 31 रोजी सायंकाळी 7:30 वाजता ब्रिटिश सरकारने भगतसिंह आणि त्यांचे दोन साथीदार सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी दिली. 24 मार्च 1 9 31 च्या दिवशी सकाळी फाशी देण्यात येणार होती. परंतु ब्रिटिश सरकारला वातावरण बिघडेल अशी भीती होती. म्हणूनच नियम पारित होईपर्यंत वाट न बघता आदल्या रात्री लाहोर सेंट्रल जेल मध्ये गपचुप फाशी देण्यात आली.

Related posts

कुत्र्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने दोघींची आत्महत्या

News Desk

दिल्लीत उद्या शरद पवारांनी बोलावली बैठक,१५ पक्षांचे नेते राष्ट्रमंचाच्या झेंड्याखाली एकत्र येणार

News Desk

पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे प्रफुल्ल पटेल यांनी ईडीच्या चौकशीला मारली दांडी

News Desk