HW News Marathi
देश / विदेश

नोटबंदीतून किती काळा पैसा आला याची माहीती नाही, आरबीआयचा संसदीय समितीला अहवाल सादर

नवी दिल्ली: केंद्र सरकराने गेल्या वर्षी लागू केलेल्या नोटंबदीतून किती काळा पैसा उघडकीस आला किंवा नष्ट केला, याबाबत कुठलीही आकडेवारी हाती आली नसल्याची धक्कादायक माहीती रिझर्व बँकेने संसदीय समितीला सादर केली आहे. ज्या कारणासाठी ही नोदबंदी लागु केली होती. ती निष्फळ ठरल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

गेल्या वर्षी केंद्र पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली. वर्षभरात १५ हजार कोटी रुपयांच्या नोटा आरबीआयकडे जमा झाल्या. एकूण चलनात असलेल्या नोटांपैकी ९९ टक्के नोटा पुन्हा जमा झाल्याने नोटाबंदीचा हेतू असफल ठरल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. त्यात आरबीआयने काळा पैसा किती आला, या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, आरबीआयकडे काळ्या पैशाची काहीही माहीती नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

याला म्हणतात लढाई… संजय राऊत यांनी केलं प्रियंका गांधींचं कौतुक

News Desk

आता परदेशातही माल्ल्याच्या अडचणीत वाढ

Gauri Tilekar

शरद पवारांनीच केला मोदींसोबतच्या भेटीचा खुलासा

News Desk
क्राइम

संघ मुख्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

News Desk

नागपूर : रॉकेलची बाटली हातात घेऊन एका युवकाने महालमधील शनिवारी सायंकाळी संघ मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. वेळीचसीआयएसएफच्या जवांनानी त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. बेरोजगारीला कंटाळून हा युवक संघ मुख्यालयासमोर आत्मदहनकरण्याच्या प्रयत्नात होता, असे सांगण्यात येते. या घटनेची नोंद कोतवाली पोलिसांनी केली असून, त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन केलेआहे. संतोष, असे या युवकाचे नाव आहे.

संतोष हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तो बीटेक झाला आहे. उच्च शिक्षित असतानाही त्याला नोकरी मिळाली नाही. त्यानेतेथील प्रशासनाला वेळोवेळी नोकरी मिळण्याबाबत विनवणी केली. त्याला कोणीही दाद दिली नाही. त्यामुळे तो हताश झाला होता.

‘मी उच्च शिक्षत आहे, मला नोकरी मिळत नाही. उत्तर प्रदेश प्रशासन मला न्याय देत नाही, संघ मुख्यालयात मला न्यायमिळेल, या मुळे मी येथे आलो आहे’,असे तो सांगत होता. सीआयएसएफच्या जवानांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली.

Related posts

अल्पवयीव विद्यार्थिंनीचा पाठलाग करून विनयभंग

News Desk

बिग बॉस मराठीमधील अभिजीत बिचुकलेला अटक

News Desk

सचिन वाझेनं अनिल देशमुखांच्या सचिवाकडे दिल्या होत्या पैशांनी भरलेल्या 16 बॅगा….

News Desk