HW News Marathi
देश / विदेश

बॉलिवूडचा सोनेरी आवाज काळाच्या पडद्याआड; बप्पी लहरी यांचं निधन

मुंबई | बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. मुंबईतील क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

याआधी भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं असून या दुःखातून संगीत विश्व सावरत नाही तोच आता आणखी एका दिग्गज गायकाने निरोप घेतला आहे. बॉलिवूडचे ‘गोल्ड मॅन’ अशी ओळख निर्माण करणारे बप्पी दा काळाच्या पडद्याआड गेले आहेत. बप्पी लहरींच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 

बप्पी दा यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५३ झाला होता. १९७३ सालच्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, १९८२ च्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटामुळे बप्पी लहरींचे नशिब खऱ्या अर्थाने उजळले. ‘तम्मा तम्मा लोगे’, ‘यार बिना चैन कहा रे’, ‘डिस्को डान्सर’, ‘याद आ रहा है तेरा प्यार’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी त्यांनी दिली आहेत. बप्पी लहरींनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये गायक आणि संगीतकार म्हणून काम केले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर प्रदेशात १ मे रोजी साजरा होणार महाराष्ट्र दिन

swarit

रिझर्व्ह बँकेचे पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर निर्बंध, बँकेचे सर्व व्यवहारसह बंद

News Desk

पुलवामामध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’च्या ४ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk