HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानमधील पेशावरमध्ये झाला बॉम्बस्फोट, ७० जण जखमी तर ७ जणांचा मृत्यू

पेशावर | पाकिस्तानमधील एक मोठी बातमी येत आहे. पाकिस्तानमधील पेशावरमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. दीर कॉलनीमधील मदरशात हा बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला असून ७० जण जखमी झाले असल्याचं वृत्त डॉन या वृत्तवाहिनीने दिलं आहे. वरिष्ठ पोलिस अधीक्षक मन्सून अमन यांनी बॉम्बस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून स्फोटाचं कारण तसंच त्यामागे कोण होतं याची माहिती घेतली जात असल्याचे सांगितले आहे.

बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांमध्ये बहुतांश मुलांचा समावेश आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने बॅग घेऊन मदरशामध्ये प्रवेश केला. नंतर बॅगेत ठेवलेला बॉम्ब फुटला. दरम्यान, मदत आणि बचाव दल घटनास्थळी पोहोचले आहे.

जखमींना जवळच्या लेडी रिंडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद आसीम यांनी सात मृतदेह आणि ७० जखमींना रुग्णालयात आणण्यात आलं असल्याची माहिती दिली आहे. जखमींवर तात्काळ उपचार दिली जात असून रुग्णालयाचे संचालक स्वत: आपातकालीन विभागात हजर असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याशिवाय रुग्णालयात वैद्यकीय सुविधेसाठी एमर्जन्सी जाहीर करण्यात आली असल्याचं ते म्हणाले आहेत.जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शीख भाविकांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला धड, १९ भाविकांचा जागीच मृत्यू

News Desk

श्नीनगर-जम्मू महामार्गावर बनिहाल येथे कारमध्ये स्फोट

News Desk

…तरीही वरिष्ठ नेत्यांना पराभवाची जबाबदारी स्वीकारावीशी वाटली नाही !

News Desk