HW News Marathi
देश / विदेश

मायावतीची नवी राजकीय खेळी, काँग्रेस अडचणीत 

नवी दिल्ली | काँग्रेसकडे उत्तर प्रदेश वगळता महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये ३९ राज्यांची मागणी बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी केल्याचे समजते. काँग्रेसच्या महाआघाडीतून भाजपला कोंडी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. परंतु मायावती यांच्या या मागणीने काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या महाआघाडीचा प्रयत्न यशस्वी झाल्यास उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांमध्ये भाजपला जोरदार झटका देण्याची काँग्रेसची योजना आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्येही बसपशी हातमिळवणीसाठी कॉंग्रेसचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. परंतु आता बसप काँग्रेसकडे महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्यांतील जागा मागून मायावती नवीन राजकीय खेळी खेळत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मराठा आरक्षणाची ८ मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी होणार

News Desk

आता हेलिकॉप्टरमधून घ्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पाहण्याचा आनंद

News Desk

छत्रपतींची तुलना मोदीचं काय,कोणाशीचं होऊ शकत नाही..

Arati More
मनोरंजन

कॉमेडीचा बादशाह लव्हगुरूच्या भूमिकेत दिसणार

News Desk

मुंबई | अनेक मराठी चित्रपटांमध्ये रोमँटिक भूमिका केलेले. सत्तर, ऐंशी आणि नव्वदीच्या दशकात मराठी सिनेसृष्टीत आपल्या नावाचा ठसा उमटवलेले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आपल्या आगामी ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमात लव्हगुरूच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटातल्या अशोक सराफ ह्यांच्या भूमिकेचे नुकतेच पोस्टर लाँच झाले आहे.

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांची निर्मिती असलेला प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटात अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, प्रियंका यादव, भूषण कडू आणि अशोक सराफ ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अशोक सराफ ह्यांच्या भूमिकेविषयी चित्रपटाचे निर्माते विनोदकुमार जैन म्हणतात, “अशोक सराफ ह्यांची ओळख कॉमेडीचा बादशाह आहे. जवळजवळ तीन दशक आपण मराठी सिनेमांतून त्यांचा रोमँसही पाहत आलोय. अशावेळी कॉमेडी आणि रोमँस दोन्हीचे गुरू असलेल्या अशोक सराफ ह्यांना ह्या मॅड कॉमेडी सिनेमातून ‘लव्ह गुरू’च्या भूमिकेत पाहणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असं आम्हांला वाटते.” तसेच हा सिनेमा ५ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Related posts

पहा… ‘मी टू’ मोहिमेबाबत काय म्हणाले अनिल कपूर

Gauri Tilekar

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

News Desk

वेबसिरिज ‘बॅडमॅन’चीमॉस्को चित्रपट महोत्सवात निवड

News Desk