HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या बीएसएफ जवानाला अटक

नवी दिल्ली | पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एका बीएसएफ जवानाला अटक केल्याची माहिती मिळत आहे. या बीएसएफ जवानाचे नाव जवान शेख रियाजउद्दीन असे आहे. रियाजुद्दीन हा मूळचा लातूरचा असल्याचे देखील म्हटले जात आहे. बीएसएफच्या बटालियनमध्ये ऑपरेटरचे काम करणाऱ्या जवान शेख रियाजउद्दीनच्या विरोधात हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाबच्या फिरोजपूरमधील ममदोट पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, देशात सर्वत्र दिवाळीची तयारी सुरु असताना पंजाबमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांकडून रियाजुद्दीनकडील दोन मोबाइल फोन आणि सात सिमकार्ड्स जप्त करण्यात आले आहेत. रियाजुद्दीनने सीमारेषेजवळील रस्त्यांचे व्हिडीओ आणि बीएसएफ युनिटमधील अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक पाकिस्तानातला पाठविले आहेत, अशी माहिती बीएसएफ डेप्युटी कमांडरने पोलिसांना दिली आहे.ब्रह्मोस क्षेपणास्त्राची अत्यंत महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या डीआरडीओमधील निशांत अग्रवालला देखील काहीच दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पीएफ’मुळे नोकरदारांची चिंता वाढली

News Desk

पुन्हा दरवाढ ; पेट्रोल, डिझेल महागले

News Desk

रवीकुमार दहिया रौप्यपदकाचा मानकरी!

News Desk