HW News Marathi
देश / विदेश

पुन्हा दरवाढ ; पेट्रोल, डिझेल महागले

नवी दिल्ली | कर्नाटक निवडणूक झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात पुन्हा एकदा वाढ होत आहे. पेट्रोलच्या किंमतीत प्रति लीटर १५ पैसे, तर डिझेल प्रति लिटर २१ पैसे वाढ करण्यात आली. कर्नाटक निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

कर्नाटक निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. कर्नाटक निवडणुकीच्या काळात २४ एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे होते. मात्र जसे मतदान संपले, तसे १४ मे रोजी दरवाढ करण्यात आली होती. १४ मे रोजी पेट्रोल प्रति लिटर १७ पैसे, तर डिझेल प्रति लिटर २१ पैशांनी महागले होते.

  • पेट्रोलचे नवे दर :-
  1. मुंबई – ८२.९४ रुपये
  2. दिल्ली – ७५.१० रुपये
  3. कोलकाता – ७७.७९ रुपये
  4. चेन्नई – ७७.९३ रुपये
  • डिझेलचे नवे दर :-
  1. मुंबई – ७०.८८ रुपये
  2. दिल्ली – ६६.५७ रुपये
  3. कोलकात – ६९.११ रुपये
  4. चेन्नई – ७०.२५ रुपये
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुरग्रस्तांसाठी अडीच हजार कोटींची मदत जाहीर

News Desk

दसरा गेला, आता बळीराजाची दिवाळी तरी गोड करा ! पंकजांनी घेतली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट 

News Desk

यंदाच्या अर्थसंकल्पातील ‘या’ वस्तू महाग आणि स्वस्त

swarit